भीषण अपघात ………………….. बंद ट्रकला ट्रॅव्हलची धडक, 25 प्रवासी जखमी, तीन तास वाहतूक ठप्प.
आनंद नक्षणे— मारेगाव
सविस्तर वृत्त असे कि, काल रात्री वणी-मारेगाव महामार्गावर गौरला स्टॉप जवळील कोंडावार यांचे शेताजवळ भीषण स्वरूपाचा विचित्र अपघात झाला. रोडच्या बाजूला बंद अवस्थेत असलेल्या उभ्या ट्रकला मागून ट्रॅव्हल भिडल्याने या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस किरकोळ जखमी तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
वणी -यवतमाळ महामार्गावर काल रात्री 9.15 च्या सुमारास यवतमाळ हून वणीकडे ट्रॅव्हल क्र.एम एच 27 ए 9994 हे जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने उभ्या आलेल्या ट्रक ला मागून धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. ही घटना राज्य महामार्गांवरील गौराळा फाट्यावर 9.15 घडली असून या अपघातातील अपघात ग्रस्ताना बाहेर काढून मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर एक महिला समोरील क्याबिन मध्ये फसल्याने तिला बाहेर काढण्यासाठी दोन तासांपेक्षा अधिक काळ लागला. नंतर तिला गंभीर अवस्थेत वणीला उपचारासाठी पाठविले. या वेळी अपघात स्थळी ऍम्ब्युलन्स, पोलीस, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेवून मदत केली.
सदर वाहन अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील प्रवासी घेवून चिमूर, चंद्रपूर कडे देव दर्शनला जात असल्याचे अपघात ग्रस्त लोकांनी सांगितले. या खासगी ट्रॅव्हल्स मध्ये सर्वसाधरण कुटुंबातील लहान मुलांबाळासह 49 प्रवासी होते. मात्र, या भीषण अपघातातात सर्वांचे दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली, दरम्यान दोन्ही बाजूंनी तीन तास वाहतूक ठप्प व व वणी मारेगाव तालुक्यातील हजारो लोक याठिकाणी मदत करीत होते.