युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत.

0
259

३६ वर्षीय तरुणाचा शेतात विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दुर्दैवी मृत्यू !

आनंद नक्षणे – मारेगाव वरूड येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय सतीश अशोक मंदे यांचा रविवारी शेतात काम करताना विद्युत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.

सतीश हे रविवारी सकाळी बारा वाजता शेतात काम करण्यासाठी गेला होता . दुपार उलटूनही ते घरी परत न आल्याने त्यांची आई त्यांना शोधण्यासाठी शेतात गेली. तेथे तिला सतीश जमिनीवर पडलेला दिसला. घाबरून तिने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला असता तिलाही विद्युत प्रवाहाचा झटका लागून ती दूर फेकली गेली.

त्यानंतर हताश आईने घरी फोन करून आपली हकीकत सांगितली. गावातील नागरिक आणि कुटुंबातील सदस्य त्वरित घटनास्थळी धावून गेले. सतीशला तात्काळ मारेगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या दुर्दैवी घटनेने मंदे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. सतीश यांच्या पश्चात आई, पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार मागे आहे.

गावात या घटनेमुळे शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. सतीश यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांनी दुःख व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here