पत्रकार कुमार अमोल कुमरे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित.

0
128

पत्रकार कुमार अमोल कुमरे उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित..

आनंद नक्षणे: मारेगाव सवित्रीबाई फुले गुण गौरव समिती, मारेगाव च्या वतीने दिल्या जाणारा “विद्यार्थी गुण गौरव” सोहळा आयोजित करण्यात आला. यात तालुकास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वृत्त प्रतिनिधी क्षेत्रातून यवतमाळ सत्ता चे तालुका प्रतिनिधी तथा सह्याद्री चौफेर चे मुख्य संपादक कुमारअमोल कुमरे यांना तहसीलदार उत्तम निलावाड साहेब व मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव वानखेडे यांच्या हस्ते ३१ जुलै रोजी शेतकरी सुविधा केंद्र येथील सभागृहात शाल व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

कुमार अमोल कुमरे यांनी आपल्या अल्पवाधित  किंबहुना डिजिटल युगात सह्याद्री चौफेर ई पेपर ची निर्मिती करून पत्रकारितेच्या कार्यकाळात विविध प्रश्नांना वाचा फोडून वणी विधानसभा क्षेत्रा सह मारेगाव तालुक्यापासून तर मुंबईपर्यंत बातम्या प्रकाशित करून जनसामान्यांना न्याय मिळवून दिला.

तहसीलदार उत्तम नीलावड यांचे कडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्वीकारताना कुमार अमोल

सामाजिक पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्य व शोध पत्रकारितेत त्यांनी मागास, दुर्गम व आदिवासी बहुल तालुक्यात प्रश्नांना वाचा फोडली. कुमारअमोल कुमरे यांच्या पत्रकारितेतील या कार्याची दखल घेऊन सावित्रीबाई फुले गुण गौरव समितीने त्यांची सन २०२३-२४ च्या तालुकास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारासाठी निवड केली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here