मारेगाव तहसील परिसरातून चोरून नेलेला ट्रक अखेर जप्त.
चार आरोपींना अटक, ट्रक मालकच निघाले सूत्रधार.
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव तहसील कार्यालय परिसरातून मागील जून महिन्यात वाळू तस्करी करणारा जप्ती ट्रक चोरून नेल्याची घटना घडली प्रशासनात पुरती खळबळ उडाली. या गंभीर प्रकरणाचा सखोल माहिती घेत पोलीस प्रशासनाने पालथे घालत ट्रक वर्धा जिल्ह्यातून ताब्यात घेतला. यातील मुख्य आरोपी असलेले चार जणांना अटक करण्यात आली असून सोबत स्विफ्ट कार जप्त करण्यात आली. या कारवाईने मारेगाव तहसील प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.
मारेगाव तालुका वाळू तस्करीसाठी प्रशासनाच्या पटलावर असतांना मागील फेब्रुवारी महिण्यामध्ये एम एच 36 – 1675 हा ट्रक वाळू तस्करी करतांना मारेगाव तालुक्यातील महादापेठ येथून जप्त करण्यात आला. सदरील ट्रक तहसील परिसरात उभा असतांना 15 ते 17 जून च्या दरम्यान चोरट्यानीं लक्ष करीत चोरून नेला.
या बाबतची महसूल प्रशासनाने पोलिसात तक्रार देत पोलीस प्रशासनाच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवीत वर्धा जिल्ह्यातील सालोद येथील शेख अफरोज शेख अब्दुल (32), शेख रोशन शेख अब्दुल (35) व पालोटी येथील प्रणय धनराज पोहाणे (24), पवन देवराव किनाके (23) यांना स्विफ्ट कार सह ताब्यात घेतले. पोलिसांनी बाजीराव दाखविताच गुन्ह्यांची कबुली देत चोरलेला ट्रक वर्धा जिल्ह्यातील आंजी येथे बंदिस्त करून ठेवला असल्याची माहिती देत एलसीबी ने सदरील ट्रक ताब्यात घेत चार जणांना अटक केली.
या कारवाईत ट्रक सह स्विफ्ट कार असा किमान 5.50 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करून मारेगाव पोलिसांच्या अधिनस्त करण्यात आला.