विनोद आदे यांना पितृशोक.
प्रसिद्ध व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड, सदाशिव आदे यांचे निधन.
आनंद नक्षणे – मारेगाव.
मारेगाव येथील सदाशिव बापुराव आदे वय वर्ष 65 यांना गेल्या सहा महिन्यांपासून रक्ताचा कर्करोग झाला होता. त्यांचा नागपूर येथील एम्स हास्पिटल मध्ये उपचार सुरू होता. त्यातून त्यांना आरामही मिळाला होता. त्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. मात्र त्यांना दोन दिवसा अगोदर निमोनिया झाला. काल त्याची प्रकृती अचानक बिघडली परिणामी त्यांना सायंकाळी नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व उपचार सुरू असतानाच मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सदाशिव आदे यांचे निधन झाले. त्यांचे मागे पत्नी शशिकला दोन मुले डाॅ. विनोदकुमार व प्रफुल व दोन मुली जयमाला व सुषमा सुन मोनाली व रिना नातवंड परी व निर्वी, काव्या आणि ग्रंथा असा मोठा आप्तपरिवार आहे.
कारपेंटर हरविल्याने मारेगांव व नवरगाव परिसरात शोककळा पसरली आहे. आज त्यांच्यावर त्याच्या राहत्या घरी मारेगांव येथे सायंकाळी ५ वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहे.