चिंचाळा ग्रामपंचायत मध्ये भरला समस्यांचा पोळा. ग्रामसेवक सुस्त सरपंच मस्त नागरिक त्रस्त….
आनंद नक्षणे – मारेगाव
मारेगाव तालुक्यातील नेहमीच वादग्रस्त राहणारी ग्रामपंचायत म्हणून चिंचाळा ग्रामपंचायत ची ओळख आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव आता समस्याच्या विळख्यात सापडले आहे. पावसाळ्याच्या पाण्याने गावामध्ये सगळीकडे चिखल दुर्गंधी आणि डेंगू सदृश्य डासांची उत्पत्ती झालेली आहे. डेंग्यू सारख्या आजाराने डोके वर काढून नागरिक त्रस्त झाले आहेत. गावात रस्ता, नाल्या यांचे कामे सुरू असून रस्त्यावर माती पाणी साचून आहे, कामे अतिशय संत गतीने सुरू आहे. निकृष्ट दर्जाची कामे व कामे करण्यात होत असलेली दिरंगाई यामुळे ग्राम वासीयांना नरक यातना सहन कराव्या लागत असल्याच्या आरोप गावातून होत आहे. मागच्या एक-दोन दिवसात झालेल्या पाण्यामुळे सगळीकडे पाणी साचून काही शेतकऱ्यांच्या कोठ्यात पाणी जाऊन जनावरांचा चारा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होवून जनावरांना सुद्धा यातना सहन कराव्या लागल्या.

वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे. सदर बाबी गांभीर्याने घेऊन ठेकेदारांकडून युद्ध पातळीवर गावातील कामे करून घेण्याची मागणी जोर करत आहे.