सचिन पचारे यांना पितृशोक, मारोती पचारे यांचे निधन.
आनंद नक्षणे — मारेगाव.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कोसारा गावचे उपसरपंच सचिन पचारे यांचे वडील मारूती जानबा पचारे वय ७८ रा. कोसारा यांचे आज दुपारी २.४५ मिनिटांनी निधन झाले.
मारोती पचरे यांना मागील एक वर्षापासून कर्करोगाने ग्रासले होते. त्यांच्यावर नागपूर, हिमाचालप्रदेश येथे उपचार करण्यात आले, परंतु त्यांच उपचाराला शरीराने साथ दिली नाही व आज त्यांचे राहते घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ग्राम विकास सोसायटीचे माजी सदस्य होते.
या दुःखद घटने मुळे कोसरा गावात शोककळा पसरली आहे.
उद्या कोसारा येथे ११वाजता त्यांचे पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. लोकवाणी जागर परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.