मारेगाव येथे युवकाची गळफास लावून आत्महत्या.
आनंद नक्षणे- मारेगाव
सैफ अली मनसुर अली सय्यद (२०) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. एका युवका सोबत त्याचा वाद होवून यातूनच त्याने घरी येवून गळफास घेतल्याची तक्रार मृतकाच्या आईने पोलिसात दिली.
बाहेरून आलेल्या सैफ ने फासी घेतली तेव्हा वडील बाहेर होते, तर आई ही घराबाहेर बसलेली होती.तेव्हा सैफ अली हा घरात गेला आणि पंख्याला कापडी ओढणी बांधून गळफास घेतला यातच त्याचा मृत्यू झाला.ही घटना लक्षात आली तेव्हा आईने हंबरडा फोडला या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.