नगरसेवक हेमंत नरांजे भारतीय जनता पार्टीत

0
507

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हेमंत नरांजे यांचा भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश.

श्री राम प्रभूंच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर जनमानसात भाजपा बद्दल प्रचंड उत्साह, मोदींचा जनमानसात जयजयकार.

आनंद नक्षणे- मारेगाव.

विराणी मंगल कार्यालय वणी येथे  भारतीय जनता पार्टीची कार्यशाळा दि.04/02/2024 ला आयोजित केली होती. त्यावेळी मारेगाव नगर पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हेमंत नरांजे यांनी वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेडी बोदकुरवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला.त्यावेळी चंद्रपूर आर्णी लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष दिनकरराव पावडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पिंपळशेंडे,भाजपा तालुका अध्यक्ष  अविनाश लांबट,भाजपा तालुका सरचिटणीस प्रशांत नांदे, माजी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, गणपत वराटे, वैभव पवार नगरसेवक, डोमाजी भादिकर व इतर सर्व भाजपा तालुका पदाधिकारी व महिला आघाडीचे सर्व भाजपा पदाधिकारी यांचे उपस्थित पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

अयोध्यातील मागील महिन्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण भारतात दिवाळी साजरी करण्यात आली. या प्राणप्रतिष्ठा सुवर्ण क्षणा नंतर संपूर्ण भारतामध्ये नरेंद्र  मोदींचा जयजयकार होत असून, भाजपा पक्षा बद्दल जनतेमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here