मारेगाव तालुक्यातील अनेक सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल.

0
546

मारेगाव तालुक्यातील अनेक सरपंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल.

विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) मजबूत.

आनंद नक्षणे–मारेगाव

नागपूर येथे मुख्यमंत्री साहेबांच्या निवासस्थानी मारेगाव परिसरातील अनेक सरपंच , उपसरपंच व  कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मारेगाव तालुक्यातील युवा नेते विशाल किन्हेकार (शिवसेना तालुका प्रमुख) शहर प्रमुख विजय मेश्राम, शिवसेना तालुका संघटक प्रवीण बलकी, विभाग प्रमुख शिवसेना राजेंद्र खडसे, विभाग प्रमुख धर्मेंद्र जाधव, युवा तालुका प्रमुख मारेगाव तुकाराम वासाडे, महिला आघाडी तालुका प्रमुख मारेगाव कल्पना गावंडे, यांच्या प्रयत्नातून हा मोठा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.

नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश करताना मारेगाव तालुक्यातील देवाळा उपसरपंच सुरेश लांडे, सरपंच करणवाडी विमल उरकुडे, उपसरपंच वाघधरा संगीता जाधव, सरपंच देवाळा रुखमाबाई कुचाळे, सरपंच कोथूर्ल्ला श्रीकांत गौरकार, उपसरपंच करणवाडी सुवर्णा खडसे, ग्रामपंचायत सदस्य हटवांजरी गजानन चौधरी, उपसरपंच हटवांजरी निखिल कालेकर, ग्रामपंचायत सदस्य हटवांजरी गणेश कुडमते, सरपंच हटवांजरी प्रिया कुडमते, उपसरपंच बुरांडा दत्ता, उपसरपंच जीवन डाखरे, उपसरपंच लाखापूर शोभा बल्की, ह्या सर्व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, पराग पिंगळे, गजानन किन्हेकर विविध कार्यकारी सोसायटी मारेगाव चे अध्यक्ष यांच्या उपस्थितीत हा सोहळा प्रवेश संपन्न झाला.

या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) हा राजकीय दृष्टिकोनातून मजबूत झाल्याचे चित्र दिसून येत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रवेशाने निश्चितच राजकीय समीकरणे बदललेले दिसून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here