जनता विद्यालय वणी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.
महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने, विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे.
राजू तुरानकर –संपादक.
जनता विद्यालय वणी येथे स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जन्मोत्सव विविध स्पर्धा घेवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या महापुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत, विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देण्यात आले.
या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरहिरीने सहभाग घेवून गीत गायन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर भाषण अश्या अनेक स्पर्धा घेण्या आल्या विशाखा मोंडे या विद्यार्थिनीने जिजाऊची वेशभूषेत उत्कृष्ट भूमिका केली.
प्रमोद राजूरकर यांनी मार्गदर्शन करताना जिजाऊ मातेने वीर सुपुत्राला जन्म दिला, त्यांचेवर बाल वयात योग्य संस्कार देत छत्रपती शिवाजी महाराज घडवला अश्या महान माता घरोघरी जन्म घ्याव्या असा मोलाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका जोगी मॅडम यांनी स्वामी विवेकानंदांनी सनातन धर्माची पताका सातासमुद्रापलीकडे फडकवली व विश्वबंधुत्वाची संकल्पना कशी रुजवली याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच उपमुख्याध्यापक डी.एस.बोबडे सर व पर्यवेक्षक व्ही. एस.आसुटकर सर, सोनकुसरे मॅडम, झाडे सर, पोडे सर, जीवतोडे मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मत्ते सर व सूत्रसंचालन मनोज खिरटकर सर आणि आभार प्रदर्शन श्वेता देवाळकर वर्ग 9 ची विद्यार्थीनी ने केले.