नगर परिषद वणी मध्ये निविदा प्रक्रियेत घोळ

0
213

मर्जीतील कंत्राटदारासाठी निविदेचे सर्व नियम धाब्यावर

नगर परिषदेचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

राजू तुराणकर — संपादक लोकवाणी जागार

वणी :- वैशिष्ट पूर्ण योजने अंतर्गत मंजूर सात कामांची वणी नगर परिषदेने ई निविदा प्रकाशित करून अवाजवी अटी लादून मर्जीतील कंत्राटदार यांना लाभ मिळवून देण्यासाठी नगर परिषदेकडून निविदेचे सर्व नियम व अटी संबंधित अभियंत्याने धाब्यावर बसून हित संबंध जोपासत मुख्याधिकारी तथा प्रशासकांनी या करिता दुजोरा देत बाह्य दडपणाखाली येवून कमीत कमी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा निर्माण करण्याची पूर्ण काळजी घेतली आहे.
या प्रकारामुळे नगर परिषदेचे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. व तसे झाल्यास सदरची भरपाई ह्या दोन्ही अधिकाऱ्यांकडून वसूल का करण्यात येवू नये असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा अध्यक्ष दिलीप भोयर यांनी उपस्थित केला आहे.
नगर परिषद वणी यांनी सदरच्या निविदेकरिता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पांजिकृत असलेली कंत्राटदारांना पात्र ठरविले आहे. असे असताना मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची निविदा संहिता व प्रणालीशी सुसंगत अश्या सर्व अटी व नियमांचे उल्लंघन केले आहे. या सात कामापैकी सिमेंट काँक्रीटचे फक्त दोन कामे एक कोटीच्या जेमतेम वर आहे. बाकी सर्व कामे एक कोटी पेक्षा कमी किमतीचे असताना सुद्धा एवढ्या उच्च क्षमतेचे फक्त आर.एम.सी प्लांट मागवून इतर बाबी गौण ठेवून अटींचे व आवश्यक क्षमतेचे चुकीच्या पद्धतीचे गणन करून ठरलेले उद्दिष्ठ  आर्थिक शक्तीचा आधार घेत गाठण्याचा जोरदारपणे मुख्याधिकारी व संबंधित अभियांत्याकडून मूजोरीने प्रयत्न चालविल्या जात असल्यामुळे जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here