वणीत संत सेवालाल महाराज जयंती साजरी

0
179

गोर बंजारा क्रांतीसुर्य सेवालाल समिती च्या वतीने सेवालाल महाराज जयंती साजरी.

गरजूना कपडे वाटप व अन्नदान …

लोकवाणी जागर 

क्रांतिसिंह सेवालाल महाराज (१५ फेब्रुवारी १७३९ – ४ जानेवारी १७७३ ) हे भारतीय समाजसुधारक होते. शूरवीर लढवय्या ‘गोरराजवंशी बंजारा’ समाजातील प्रख्यात सतगुरू होते. क्रांतिसिंह सेवालाल महाराज यांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गुट्टी तालुक्यातील गोलाल डोडी गावात झाला. आता ते गाव सेवागड या नावाने ओळखले जाते.


सेवा ही समर्पण है ह्या सेवाभावी वृतीतून संत सेवालाल महाराज जयंती ऊत्सव निमीत्त, च्या वतीने
गुरुवार दिनांक 15/2/24 रोजी सकाळी 9:30 वाजता अन्नदान करण्याचे आले. संत सेवालाल महाराज भोग विधी झाल्यानंतर, लगेच अन्नदानाचा करून गरजूना कपडे वाटप करण्यात आले. ह्यावेळी दत्तात्रय जाधव, विजय राठोड, मनोज राठोड, अवि पवार , गौरव चव्हाण, विनोद राठोड, जितु राठोड, गोविंद राठोड, डाॅ महेंद्र लोढा, अजय छल्लानी, प्रफुल खिवंसरा, योगेश खिवंसरा, कालुसेठ अमरवानी व प्रवीण खानझोडे सह शेकडो समाज बांधव व मित्रपरिवार उपस्थित होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here