भाजपा जिल्हा शिक्षक आघाडीची कार्यकारणी घोषीत.
सुनील अस्टकार जिल्हा संयोजक पदी.
राजू तुरणकर – संपादक लोकवाणी जागर.
भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने जिल्हा शिक्षक आघाडी ची कार्यकारणी दि.१० मार्च २०२४ रोजी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी घोषीत केली. या वेळी जिल्हा सरचिटणीस राजु पडगिलवार, भाजपा युवा मोर्चा राज्यमहामंत्री सुरज गुप्ता, राज्य शिक्षक आघाडी सहसंयोजक नितीन खर्चे, शंतनु शेट्ये इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा संयोजक या महत्त्वाच्या पदावर सुनिल आष्टकार, जिल्हा सहसंयोजक राजेश शर्मा, अमरजीत कळसकर, देवानंद भिसे, यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्र प्रमुख मा. अविनाश रोकडे, चंद्रपुर-आर्णी लोकसभा क्षेत्र प्रमुख संजय गोंदे, राळेगांव विधानसभा क्षेत्र प्रमुख माधव कोहळे, वणी विधानसभा क्षेत्र प्रमुख शंकर बांदुरकर, यवतमाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख कृपा पटेल, आर्णी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रकाश राठोड, तालुका अध्यक्ष यवतमाळ अशोक चारमोडे, पांढरकवडा तालुका प्रमुख राजु राठोड, झरी तालुका प्रमुख सुरेश येमुलवार, बाभुळगांव किशोर हजारे, कळंब ज्योतीताई हारगुडे, मारेगांव मुकेश महाडोळे, घाटंजी प्रशांत उगले, राळेगांव अतुल दांडेकर, वणी सुनिल टिकले, आर्णी विशाल राठोड, जिल्हा सदस्य, मनोज लांबाडे कळंब, अतिश चव्हाण राळेगांव, धनराज ठेपाले मारेगांव, कृष्णराव माकोडे यवतमाळ, अविनाश भेदोडकर बाभुळगांव, रविंद्र मेश्राम वणी, वंदना मत्ते राळेगांव, रमेश खेकारे मारेगांव, गौरव भादिकर मारेगांव ईत्यादींची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्या मुळे संपूर्ण जिल्ह्यात शिक्षक वर्गात आनंद पसरला आहे.