मानकी येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रम संपन्न

0
74

मानकी येथे “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान

चिमुकल्यांनी गोळा केली अमृत कलशामध्ये गावातील माती.

राजू तुरणकर

देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित “मेरी मिट्टी मेरा देश” अभियानानिमित्त मानकी येथे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मंगल कलशामध्ये माती व मुठभर – तांदूळ संकलन केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त १२ मार्च २०२१ पासून सुरु केलेल्या उपक्रमाची सांगता म्हणून मेरी माटी मेरा देश अर्थात ‘माझी माती माझा देश या मोहिमेची संकल्पना करण्यात आली.
या अभियानाचा शेवटचा टप्पा म्हणजे अमृत कलशयात्रेचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये देशभरातील गावातील माती गोळा करण्यात येवुन ते अमृत कलश देशाची राजधानी दिल्ली येथे विशेष रेल्वेद्वारा एकत्रित केले जाणार आहेत.

त्याच अनुषंगाने वणी तालुक्यातील मानकी येथे ग्रामपंचायत व जि.प.उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने दिनांक २७ सप्टेंबर ला मंगळवारी सकाळी गावात कलश यात्रा काढून शाळकरी मुलांसह गावातील नागरिकांकडून मुठभर माती व तांदूळ संकलन केले.
सरपंच कैलास पिपराडे यांनी सर्वप्रथम या कलशात मुठभर माती टाकुन या यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर घोष पथक व राष्ट्र ध्वजासह गावात जाऊन विद्यार्थी व शिक्षकांनी माती गोळा केली आहे. या उपक्रमाला पालकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे मुख्याध्यापक आनंद पाटील, वाटेकर सर, कैलास कुळमेथे सर, घोनमोडे सर, शिक्षीका रोहीनी मोहीतकर व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच कैलास पिपराडे, ग्रां.पं.सदस्य नानाजी पारखी, नलीनी मिलमीले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे, शाळा समिती अध्यक्ष विजय काकडे, पोलिस पाटील मिनाक्षी मिलमिले, ग्राम पंचायतच्या सचिव कविता कातकडे, प्रदिप मालेकर, अमर खुसपुरे, अविनाश सरवर, नानाजी नेहारे, अंगणवाडी सेविका बेबीताई मालेकर, महिला गटाच्या अध्यक्षा  अरुणा वासेकर, मदतणीस सुनिता पत्रकार, यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here