वणीत भरदिवसा चोरी, महिलांनो सावधान.
महिला गेली आंघोळीला, चोरांनी साधला डाव.
राजू तुरणकर— वणी
आज दिनांक 30 सप्टेंबर 2023 ला भर दिवसा दुपारी दीड वाजेच्या सुमारास वणी शहरातील भोंगळे लेआऊट मध्ये घरफोडी झाल्याची घटना घडली आहे.
वणी शहरातील भोंगळे लेआऊट मधील काशिनाथ उपासे यांचा मुलगा मनोज हा एक वाजता घरून ड्युटीवर जाण्या साठी निघाला आणि त्याची पत्नी मयुरी एकटी घरी होती.घराच्या समोरील दार अंदरून लावलेले होते व फाटक सुद्धा लावलेले होते. मनोज ची पत्नी आंघोळ करण्यासाठी बाथरूम मध्ये गेली आणि नेमके त्याच वेळेस चोरांनी घराच्या जिन्याच्या जवळून एक दार आहे ते नेमके उघडे होते, तिथूनच चोरांनी आत प्रवेश केला घरात प्रवेश करून चोरी केली. चोरीमध्ये रुपये पंधरा हजार रुपये गेले. घरातील सोने दुसरीकडे आजच जागा बदलवून ठेवले असल्यामुळे ते चोरांच्या हाती लागले नसल्याचे कळते.पर्समध्ये ठेवलेले पंधरा हजार रुपये मात्र घेवून चोरटे पसार झाले.
वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पंचनामा करून गेले असून त्यांना शोधून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.