मटन विक्रिचे दुकान दर रविवारी आठवडी बाजारात मच्छी मार्केच्या बाजुला लावू देण्यासाठी मटण विक्रेते आक्रमक.
मटण विक्रेत्यांनी शिवसेनेचे ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे वणी विधानसभा संपर्क प्रमुख संजय देरकर यांना निवेदनाची प्रत देवून मांडल्या व्यथा…
राजू तुरणकर – संपादक.
वणीतील मटन मार्केटचे दुकान आठवडी बाजार येथे बसत होते. परंतू श्री रंगनाथ स्वामी यात्राच्या निमित्ताने सर्व दुकाने पुढे ढकलण्यात आले. रंगनाथस्वामी यात्रा एक महिन्याची होती ती आता संपली आहे. परंतु दर रविवारी भरणाऱ्या बाजाराचे दिवसी फक्त आठवडयातून एक दिवस आमचे दुकान पुर्ववत ठिकाणी लावू देण्याची मागणी मटण विक्रेत्यांच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद वणी यांना निवेदन देवून करण्यात आली आहे.
मटन विक्रेत्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर शिवसेनेचे नेते वणी विधानसभा संपर्कप्रमुख संजय दरेकर यांची भेट घेऊन निवेदनाची प्रत देऊन आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमख अजिंक्य शेंडे उपस्थित होते.
नगर परिषदेने ठरवून दिलेल्या ठिकाणी सध्या मटन विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. तेथील जागा संपूर्ण शेतीची असल्यामुळे पावसाळ्यात चिखल साचून एवढेच नव्हेतर संध्याकाळच्या वेळी साप, विंचूची प्राण्यांची भिती वाटते आणि महिलांना तिथे समोर यायला त्रास होतो.
काही ग्राहक मटन घेण्यासाठी येतात परंतू त्यांना जुन्या जागेवरील मटनाचे दुकान दिसतच नाही त्यामुळे नाईलाजाने त्यांना परत जावे लागते आणि विनाकारण ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून फक्त आठवडयातून एकदा आठवडी बाजारामध्ये पूर्ववत ठिकाणी जिथे आज रोजी ज्या ठिकाणी मच्छीचे, कोबडयाचे दुकान आहेत, त्या परिसरामध्ये खुली जागा आहे तिथे फक्त एक दिवसाकरितां आठवडी बाजारामध्ये मटनाचे दुकान लावू देण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे मांस विकीचे दुकान अथवा अनेक दुकाने आठवडी बाजारामध्ये मागील साठ ते सत्तर वर्षापासून त्याठिकाणी सुरळीत आजपर्यंत चालू आहे व कोणत्याही प्रकारचा वाद-विवाद न होता सर्व व्यवसायधारक आपला व्यवसाय करीत आहे. निवेदन देते वेळी प्रितेश लोणारे, नरेंद्र लोणारे, रमेश ढोके, रमेशराव लोणारे, संतोष डोक,शेगा इस्माईल, आफताब शेख, शेता गुलाब , अन्दुत शेख,संतोष पारवे,नवनाथ रावेकर, रमेश ढोक , जयुष लोणारे, अनसार वेग, भूषण पारवे उपस्थित होते.