सत्तेचा विचार हुकुमशाही निर्माण करतो तर विचारांची सत्ता लोकशाही निर्माण करते- प्रा. डॉ. संतोष डाखरे.
राजू तुरणकर— वणी
सत्तेचा विचार हुकुमशाही निर्माण करतो तर विचारांची सत्ता लोकशाही निर्माण करते. लोकशाहीमधे राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता असल्याने ती संपादन करण्याकरीता विचारी व बुद्धिजिवी युवकांनी राजकारणात यावे, असे आवाहन स्तंभलेखक प्रा.डॉ. संतोष डाखरे यांनी केले.
लढा संघटनेच्यावतीने आयोजित “आजची राजकीय परिस्थीती व युवक” या विषयावरील जाहीर व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते.
शहिद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त आयोजित या कार्यक्रमात डॉ. डाखरे यांनी वर्तमान राजकीय परिस्थतीवर परखड भाष्य केले. राजकारण हे वाईट, घाणरेडे व धनिकांचे आहे अशी टिपणी करण्यापेक्षा निवडणूकीच्या माध्यमातून व्यवस्थेमधे सहभागी होऊन छत्रपती शिवराय, भगतसिंग आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्याकरीता युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
वैदर्भीय बोलीत भन्नाट काव्य मैफिलमित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मा. अनंत राऊत, अकोला यांनी भन्नाट वऱ्हाडी भाषेत कविता सादर केल्या व शासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुणांचे सत्कार गजानन स्पोर्ट्स चे वतीने करण्यात आले. सोबत वणी परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल शेखर वांढरे, किरण दिकुंडवार, वैभव ठाकरे, प्रा. डाँ दिलीप मालेकर, सागर जाधव, प्रविण खंडाळकर सर, रुपेश पिपंळकर, विनोद आदे, अफरोज सर, शहाजद सर, संदीप गोहोकार, गणेश आसूटकर, सोपान लाड यांचा विशेष सत्कार कारण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर आशिष खुळलंगे, संजय खाडे, प्रा.डॉ. दिलीप मालेकर, वैभव ठाकरे, अजय धोबे उपस्थित होते. संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी लढा संघटनेचे प्रविण खानझोडे, विकेश पानघाटे, अॅड. रुपेश ठाकरे, ललीत लांजेवार, अजय धोबे, राहुल झट्टे, अमोल लांबट, विवेक ठाकरे, इम्मामुल हुसेन , सुभाष लसंते, शरद खोंड, राजू पिंपळकर यांनी परिश्रम घेतले.