देवीच्या ४५ भक्तांनी केले रक्तदान.. बोरगाव येथील मंडळाचा स्तुत उपक्रम.

0
483

नवरात्रोत्सव च्या निमित्ताने बोरगाव येथे रक्तदान शिबिर संपन्न. शारदा माता मंडळाचा स्तुत्य उपक्रम.

देवीच्या ४५ भक्तांनी केले रक्तदान….

राजू तुरणकर – संपादक लोक वाणी जागर.

विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी रक्ताला पर्याय शोधू शकले नाही. एखाद्या इसमाला अपघातामध्ये रक्तस्त्राव झाला तर त्याचे प्राण वाचवण्यासाठी दुसऱ्या माणवाचेच रक्तच उपयोगी ठरू शकते हे त्रिकालाबाधित  सत्य ओळखून बोरगाव येथील मंडळाने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मानव उपयोगी रक्तदान शिबिराचे आयोजन केले.

नवरात्र उत्सव निमित्त दिनांक ०७/१०/२०२४ सोमवार ला शारदा माता मंडळ बोरगाव (में) च्या वतीने गावामध्ये प्रथमच भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात होते.त्यात गावातील देवीच्या ४५ भक्तांनी  रक्तदान केले.

शासकीय वैद्यकीय जिल्हा रुग्णालय चंद्रपूर  यांचे रक्त संक्रमण अधिकारी यांनी शिबिर घेण्यात आयोजक शिवराम चिडे, मंगेश खाडे, योगेश आवारी, महादेव कोल्हे, प्रवीण आवारी, मिलिंद खाडे, संदीप डंभारे, खोविरज देरकर, राहुल कोल्हे, प्रजोत कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, आशिष क्षीरसागर, यश डंभारे, गणेश देरकर, धनराज येसेकर, ओम गौरकर, अविनाश आवारी, मंथन सावे व समस्थ शारदा माता मंडळ यांना मदत केली.

यावेळी गावातील जनतेने उस्पूर्त सहभाग घेतला व उपक्रमाचे कौतुक केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here