तुरविले एज्युकेशन इन्स्टिट्युट मध्ये महात्मा गांधी प्रश्न मंजुषा.

0
287

तुरविले एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मध्ये महात्मा गांधींच्या जिवनावर प्रश्न मंजुषा संपन्न.

राजू तूरणकर—संपादक.

तुरविले एज्युकेशनल इन्स्टिट्यूट वणी येथे दि. ७/१०/२०२३ ला महात्मा गांधींच्या विचारधारेला अनुसरून प्रश्न मंजुषा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकुण विस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांचे पाच गटात विभाजन करण्यात आले होते. एकुण ५० प्रश्न विचारण्यात आले. त्यातील दोन गटाला अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक देण्यात आले. प्रथम पारितोषिक गट अ मधील  पूनम पडोळे,  रुपाली गिरतकर, प्रणय पुंडे आणि शंकर नवलकर यांना मिळाले आणि द्वितीय पारितोषिक गट क मधील  शिवानी पिंपळकर, क्रीष्णा निवलकर,  सिद्धी कोंडावर, आणि आर्यन सिदुरकर यांना मिळाले. त्या गटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय वस्तूंचे पारितोषिक वितरण करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना सुध्दा शालेय वस्तूं प्रोत्साहनपर देण्यात आले. महात्मा गांधींचे आवडते भजन ‘ वैष्णव जन ते तेणे कहइए..’ हे गाऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here