वाघमारे साऊंड चे संचालक प्रवीण वाघमारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

0
667

प्रवीण वाघमारे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

मुक, बधीर, अपंग निवासी कर्मशाळा वणी येथे संपन्न.

राजू तूरणकर—वणी

प्रसिद्ध वाघमारे साऊंड घोन्साचे संचालक प्रवीण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक, बधीर अपंग निवासी कर्मशाळा वाघदरा (सरोदे मोहल्ला,दर्ग्याजवळ) येथे मुला , मुलींना बुक, पेन वाटप व स्नेहभोजनाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक १० ऑक्टोंबर ला सायंकाळी सहा वाजता आयोजित केला होता.

विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने बुक, पेन, फळ भेट देत इतरांनीही असेच अनुकरण करावे व मतिमंद मूकबधिर, अस्थिवंग बांधवांचे मनोधैर्य वाढविणारे उपक्रम राबविण्याचे आवाहन करत, सुरू असलेल्या सामाजिक कार्यास मदत जोपासावी या उद्देशाने याठिकाणी हा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच संस्थेच्या सर्व शिक्षकांनाही करत असलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करत वाघमारे कुटुंबीयां कडूनही आभार मानण्यात आले. यावेळी संतोष कींगरे, अभय पारखी , लंकेश चुरे,अतुल डफ, अरुण बिलोरिया, दत्तू आस्कर, नईम शेख, चंद्रभान देवळकर, उत्तम पाचभाई, पवन एकरे, वैभव कौवरासे, अनिल बोढले, वसंता थेटे, सोनू थेटे, दिपलाल चौधरी, प्रदीप मुके, संजय चिंचोलकर, कैलास बोबडे, बाळू तूरणकर, राजेश क्षीरसागर , राजेंद्र क्षीरसागर, राहुल चौधरी, पांडुरंग वाघमारे, श्रीमती कलावती क्षीरसागर, नंदा वाघमारे, सुनीता वाघमारे, संजय तूरणकर , प्रशांत महाकुलकर, सारंग बिहारी  उपस्थित होते.

हिच खरी देवपूजा— राजू तूरणकर

 आपल्या जीवनात पद, पैसा, प्रतिष्ठा मिळण्याचा आनंद क्षणिक असतो, ज्यांना शारीरिक व्यंगत्व आहे, अश्याना समाज टाळत असतो, परंतु मुले देवाघरची फुले ह्या म्हणीला खरे करीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याच्या प्रवीण वाघमारे यांचा हा प्रयत्न हा सर्वांच्या मनाला स्पर्श करून. हाच आनंद हा खरा आनंद असतो आणि वाढदिवशी या बालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी प्रवीणची देवपूजा आहे : राजू तूरणकर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here