प्रकाशच्या प्रसांगावधानाने वाचले चार जीव.

0
871

प्रकाशच्या प्रसांगवधानाने वाचले चार जीव. वणी शहरातील चित्तथरारक घटना.

फार मोठा अनर्थ टळला, दोन्ही पाय जळले, आर्थिक हानिवर संकट टळले.

राजू तुरणकर —वणी.

कधीकाळी माणसाची समयसूचकता आणि प्रसांगवधान मनुष्याला फार मोठ्या संकटातून कसी सुटका करून घेते आणी आलेल्या संकटातून बाहेर पडल्यानंतर त्या प्रसंगाची आठवण केली तर अंगावर कसे काटे येतात असाच एक प्रसंग वणी शहरात परवा घडला, आणि प्रकाशचा परिवार आज गुण्या गोविंदाने हसत खेळत आहे.

सविस्तर वृत्त: वणी शहरातील गुरूनगर येथील जनता हायस्कूल ते जय परसापेन हॉस्टेल या लाईन मध्ये लीहितकर यांचे कडे एसटी महामंडळात चालक असलेले प्रकाश बापूराव पेंदोर हे भाड्याने राहतात. शनिवार दिनांक 7 ऑक्टोंबरला ड्युटी वरून आलेनंतर झोपतेवेळी कान दुःखत असल्याने, कान शेकण्यासाठी गॅस लावला, तोच अचानक गॅसने पेट घेतला, संपूर्ण स्वयंपाक गृहात आगीच्या ज्वाळा उठू लागल्या, आणी जिगरबाज प्रकाशने घटनेची तीव्रता ओळखून घरातील सर्व सदस्यांना घराबाहेर काढले, आरडाओरड झाल्याने शेजारी, पाजारी बघ्यांची गर्दी जमा झाली, मात्र प्रकाशने एक ब्लँकेट पाण्यात ओले केले, आणी घरात घुसन जळत्या गॅस वर टाकून बाहेर पेटत्या गॅस ला बाहेर ओढत आणले आणी पाणी भरून असलेल्या नळाच्या टाक्यात टाकले, आणी अनर्थ टळला मात्र या संपूर्ण प्रकरणात प्रकाशच्या दोन्ही पायाला इजा झाली, स्वयंपाक घरातील, किराणा, इलेक्ट्रिक, डब्बे जळून खाक झाले, प्रकाशने खाजगी दवाखन्यात स्वतःवर उपचार करून घेतले. रवी गॅस एजंसी मार्फत दुसरे दिवशी पाईप, रेगुलेटर लावून देण्यात आले. सरकारी हेलपाटे टाळण्यासाठी त्यांनी कोणतीच तक्रार केली नाही.

एकंदरीत प्रकाश पेंदोर यांच्या हिमतीला दाद द्यावी लागेल, त्यांच्या प्रसांगवधानामुळे फार मोठा अनर्थ टळला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here