आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणुन साजरी.
सा. मुक्त ललकार चे संपादक प्रवीण शर्मा यांचा पत्रकार दिनी सत्कार.
राजु तुरणकर – संपादक.
आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी रोजी जेष्ठ पत्रकार माधवराव सरपटवार यांच्या निवासस्थानी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार जब्बार चिनी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साप्ताहिक मुक्त ललकार चे संपादक प्रविन शर्मा उपस्थित होते.
यावेळी सरपटवार सर यांनी वणीतून प्रकाशित होणाऱ्या प्रथम वृत्तपत्राची माहीती व आज पर्यंत किती साप्ताहिक पाक्षिक प्रकाशित झाले, त्यांची आठवण केली आणि त्यामध्ये स्वर्गीय दिवानचंदजी शर्मा यांचे फक्त एकमेव साप्ताहिक मुक्त ललकार हे दैनिक सातत्याने आजही निरंतर 45 वर्षापासून प्रकाशित होत आहे, त्यामुळे प्रवीण शर्मा यांचा माधवराव सरपटवार यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात लोकमतचे जब्बार चिनी, गजानन कासावार तुषार अतकरे, अनिल बिलोरिया, प्रशांत गोडे, विनोद ताजने सर, जितेंद्र डाबरे,रमेश तांबे, सागर मुने, परशुराम पोटे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.