उज्वल गोरक्षण संस्था वणीला संजय खाडे यांचेकडून ५१ हजार रूपयांची आर्थिक मदत.
राजू तूरणकर: वणी उज्वल गोरक्षण संस्था वणी येथे संजय रामचंद्र खाडे, अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. वणी यांनी या संस्थेला ५१ हजार रूपयांचा धनादेश देवून आर्थिक मदत केली. तसेच गोमातेला सहकुटुंब सहपरिवारासह चारा खाऊ घालून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मुक्या प्राण्यांना अभय हिच खरी देवपूजा असल्याचे संजय खाडे यांनी यावेळी सांगितले.
हिंदू धर्मात गोमेतेला फार मोठे पुज्यनिय स्थान आहे. गायीचे पावित्र्य, हिंदू धर्मात गाय ही दैवी आणि नैसर्गिक उपकाराची प्रतिनिधी आहे अशी श्रद्धा आहे आणि म्हणून तिचे संरक्षण आणि पूजन केले जाते हे तत्त्व हेरून संजय खाडे सहपरिवाराने एकप्रकारे नवरात्र उत्सवात गोमातांच्या सेवेसाठी मदत करून देवी देवतांवर असलेला विश्वास सार्थ केला.
याप्रसंगी लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा संगिता संजय खाडे, रंगनाथस्वामी अर्बन निधी चे उपाध्यक्ष ईश्वर खाडे, उज्वल गोरक्षण संस्थेचे पदाधिकारी राजाभाऊ पाथ्रडकर, सुधाकर काळे (गुरुजी) अजय चेंदे, प्रकाश कवरासे, अनुप खत्री, डॉ. राठोड, संजय पांडे, भगवान पोपली, मनोहर नागदेव, चंद्रकांत जोबनपुत्रा, आनंद खोकले, सुहास लांडे, प्रतिक गेडाम आदि मोठ्या संख्येनी उपस्थित होते.