वणी येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन.
चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे व्याख्यान.
राजू तूरणकर— संपादक.
शिव महोत्सव समिती वणी द्वारा “बळीराजा” व्याख्यानमालेचे दिनांक 27 व 28 ऑक्टोबर रोज शुक्रवार व शनिवारला सायंकाळी 6: 30 वा. बाजोरिया लॉन,वरोरा रोड, वणी येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिवमहोत्सव समिती वणीच्या वतीने दरवर्षी दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. व्याख्यानमालेचे हे नववे वर्ष आहे. यावर्षी वक्ते म्हणून मुंबई येथील प्रख्यात व्याख्याते, पत्रकार- संपादक, नाट्यनिर्माते, नट -गायक आणि विचारवंत अशी विविधांगी ओळख लाभलेले तथा मराठीतील सर्वाधिक खपाच्या साप्ताहिक “चित्रलेखा” चे संपादक ज्ञानेश महाराव उपस्थित राहणार आहे.
शुक्रवार दि.27 ऑक्टोबर रोजी स्मृतीशेष सांबशिव नारायणराव देवडे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ “फक्त राष्ट्रभक्तांसाठी” हा व्याख्यानाचा विषय असून शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी स्मृतीशेष रामचंद्र जागोजी सपाट यांचे स्मृतीप्रित्यर्थ “शाहिरांची लोकशाही”हा व्याख्यानाचा विषय आहे.
या व्याख्यान मालेत यापूर्वी मा. गंगाधर बनबरे, कॉम्रेड स्मिता पानसरे, मा. विजय जावंधिया,डॉ.मंजुश्री जयसिंगराव पवार, मा.उत्तम कांबळे, मा. चंद्रकांत वानखेडे, मा.साहेब खंदारे, डॉ. प्रल्हाद लुलेकर इत्यादी नामवंत वक्त्यांची व्याख्याने झालेली आहेत.
वणी शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिकांनी सहकुटुंब व इष्टमित्रांसह उपस्थित राहून व्याख्यानाचा आस्वाद घ्यावा, असेआवाहन शिव महोत्सव समिती,वणीच्या वतीने करण्यात येत आहे.