सेवादल कॉंग्रेस कमिटीतर्फे स्व. इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त अभिवादन.
राजू तूरणकर
वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे स्व.माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम घेण्यात आला व स्व.इंदिराजी गांधी प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारताची पंतप्रधान प्रथम महिला प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांनी देशाची धुरा सांभाळली व धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सक्षम असल्याने त्यांना आर्यन लेडी म्हणून उपाधी देण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार वामनराव कासावार, प्रमोद निकुरे शहर अध्यक्ष प्रमोद वासेकर तालुकाध्यक्ष, प्रमोद लोणारे अध्यक्ष शहर सेवादल, वामन कुचणकर, घनश्याम पावडे, काजल अखतर शेख,अफसर शेख, सुरेश बन्सोड, रवी कोटावार, महादेव दोडके, अलका खोब्रागडे, सुवर्णा कणाके इत्यादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.