मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबिर.
वणी, मारेगाव येथील यशस्वी शिबिरांची सांगता करून आता मुकुटबन येथे गरजवंत जनतेला मिळणार दिलासा .
राजू तूरणकर – वणी.
समाजासाठी काहीतरी करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण त्यांच्यातले काहीजण मात्र खरोखरच तन मन धनाने उभे राहतात, आणि आपल्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या एखाद्या कामासाठी झोकून देतात. असाच उपक्रम मागील अनेक दिवसापासून स्व. पारसमल चोरडिया फाऊंडेशन वणी यांचे विद्यमाने विजय चोरडिया यांच्या सामाजिक दायीत्वातून सुरू आहे. कस्तुरबा हॉस्पिटल्स सेवाग्राम यांचे विद्यमाने मुकुटबन व भालर येथे मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज शहरात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी अनेक पोस्टर प्रदर्शन स्पर्धा सुरू केली आहे. परंतु विजय चोरडिया मात्र स्वकमाईतून समाजातील दुःख व गरजवंताच्या गरजा ओळखून जे कार्यक्रम लावीत आहे, ते खऱ्या अर्थाने त्यांचं काम फार मोठं नसेलही कदाचित, पण समाज पुढे जाण्याच्या प्रक्रियेत तो खारीचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. अशा सेवाव्रतींना ‘लोकवाणीजागर’ चा मानाचा मुजरा
१८ नोव्हेंबर २०२३ रोज शनिवारी जिल्हा परिषद शाळा भालर येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, तसेच १९ नोव्हेंबर रोजी श्री राजराजेश्वर शिव मंदिर, बस स्टॅण्ड चौक, मुकुटबन येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. तरी गरजु रूग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक विश्र्व हिंदू परिषद, बजरंग दल,समाज सेवा हिच ईश्वर सेवा फाऊंडेशन यांनी केले.