वर्ल्ड कप लाईव्ह चौकातील राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला युवा सेनेचा विरोध.
शहराला बेसिस्तीकडे नेणाऱ्या कार्यक्रमाचा विरोध : अजिंक्य शेंडे.
राजू तूरणकर वणी
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या वर्ल्ड कप फायनल च्या अंतिम सामन्याचे १९ तारखेला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे थेट प्रक्षेपन काही राजकीय पक्ष करणार असल्याने सदर कार्यक्रमाला परवानगी न देण्यासंदर्भात युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे.
उद्या 19 तारखेला विश्वचषक सामन्याचा अंतिम सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. वणीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या सामन्याचे थेट प्रेक्षपन मनसे व भाजप यांच्याकडून मोठ्या एलईडी टिव्हीवर दाखविण्यात येणार आहे. साहजिकच शहरातील हा चौक अत्यंत रहदारीचा आहे. सामना सुरू झाल्यानंतर या चौकात क्रिकेट प्रेमिंची संख्या वाढणार आणि याचा फटका वाहतुकीला होणार आहे. ज्यामुळे जनतेची गैरसोय होणार यात शंका नाही. रविवार दिवस असल्याने या दिवशी वणीचा बाजाराचा दिवस आहे. बाजारात आलेल्या लोकांची या सामन्याने चांगलीच गैरसोय होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वणी वरोरा रोडचे काम सुरू आहे तसेच एकता नगर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने जनतेची या रस्त्यावरून वाहतूक होणार नाही. त्यातच प्रशासनाने या राजकीय पुढाऱ्यांना थेट प्रेक्षपण दाखविण्याची परवानगी देवू नये . या राजकीय पुढाऱ्यांना जर असे कार्यक्रम घ्यायचे असल्यास त्यांनी आपल्या स्वमालकीच्या जागेत घ्यावे. सार्वजनिक जागेत व रस्त्यावर नाही. या प्रेक्षनात कर्कश आवाजात डिजे वाजणार असल्याचीही माहिती आहे. ज्यामुळे ध्वनिप्रदूषण होणार आहे हे तितकेच सत्य आहे. अन्यथा याच चौकात युवसेना आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार. व होणाऱ्या परिणामास पूर्णपणे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक जबाबदार राहणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आता पोलीस प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.