नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
गोरगरिबांचे वाली विजय बाबु चोरडिया यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या शिबिरात ६८७ रुग्णांनी घेतला लाभ.
५ डिसेंबर ला होणार चष्मे वाटप: विजय चोरडिया.
राजू तुराणकर संपादक लोकवाणी जागर.
डोळ्याने दिसत नसेल, तर जीवन अंधकारमय होतं, मानवी जीवनात सर्वाना जे भोगावे लागते ते अर्थातच गरीब श्रीमंत कोणीही असो त्यांना हे चुकलेले नाही, पण श्रीमंतीमुळे बऱ्याच गोष्टी सहज सुटतात आणि सोयीस्कर होतात हे मात्र नक्की, परंतु गरीब असेल तर ते दुःख दारिद्र्याचे डोंगर बनून मानवी जीवन जगणं कठीण होत असत. मात्र समाजातील हेच दुःख हेरून आपले स्वकमाईतील खारीचा वाटा जर समाजातील दुःख वेचण्यासाठी लावतो, तो माणूस गरजवंतांच्या नजरेत देवदूत ठरतो, असाच मोठ्या मनाचा माणूस विजय चोरडिया हे मागील अनेक दिवसांपासून वणी विधानसभा क्षेत्रातील वणी , मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यात भव्य अशा मोठ्या प्रमाणामध्ये नेत्र शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करीत आहे, यातून काल भालर आणि मुकुटबन येथे भव्य मोफत नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ६८७ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे.
शनिवारी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी ४ या वेळेत भालर येथील जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आलेल्या शिबिरात एकुण ३०० रुग्णांनी लाभ घेतला तर ३२ लोकांना शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात आले तर रविवारी १९ नोव्हेंबर रोजी मुकुटबन येथील श्री राज राजेश्वर शीव मंदिरात घेण्यात आलेल्या शिबिरात ३८७ लोकांनी लाभ घेतला असून ३८ रुग्णांना मोतिया बिंदु शस्त्रक्रियासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठविण्यात आले आहे.
सदर शिबिरात कस्तुरबा हॉस्पिटल, सेवाग्रामच्या टीम ने आरोग्य सेवा दिली. विशेष म्हणजे विजय बाबु चोरडिया यांनी यावेळी प्रत्येक शिबिरार्थींची आस्थेने विचारपूस करून प्रत्येक रुग्णांची काळजी घेतली आहे. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णांना येत्या ५ डिसेंबर रोजी चष्मे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती विजय बाबु चोरडिया यांनी दिली आहे.
सदर शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, समाज सेवा हिच ईश्वर सेवा फाउंडेशन व स्व. पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणी यांच्या सहकार्यातून करण्यात आले होते.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, समाजसेवा हिच ईश्वरसेवा फाउंडेशनचे सदस्यांनी परिश्रम घेतले.