यवतमाळ येथील ओबीसी महामोर्चाला नाभिक महामंडळाचे समर्थन

0
63
यवतमाळ ओबीसी महामोर्चाला नाभिक महामंडळाचे समर्थन.समाज बांधवांना उपस्थित राहण्याचे यवतमाळ जिल्हा नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष डूड्डू नक्षणे यांचे  आवाहन.
यवतमाळ येथे आरक्षण समर्थनार्थ ओबीसींच्या विविध मागण्या करीता महामोर्चाचे  २६ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजनकरण्यात आले आहे.
सदर मोर्चा मध्ये समस्त नाभिक समाज बांधवांनी सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. ओबीसीतील आपल्या हक्काचे 0 आरक्षन कोणालाही घेऊ देणार नाही. शासनाला आरक्षण द्यायचे झाल्यास त्यांनी आरक्षण कुठुनही दयावे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावल्यास सरकारला महागात पडेल लक्षात ठेवा असे आवाहन नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हा च्या वतीने करण्यात आले आहेत.
यावेळी या सभेला अरुण नक्षणे, विजय धारकर, निळकंठ तायडे , गजानन महाराज पापळकर , सपनिल वाटकर, पुंडलिक कुबडे ,शेखर वानखेडे, अबांदास धामोरे, राजेंद्र नागतुरे ,महेश हसुलकर, महीला जिल्हा अध्यक्षा शोभाताई नक्षिणे ,महाराष्ट्र नाभिक महामंडळ चे जिल्हा अध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे , नगाजी महाराज मंदीर चे अध्यक्ष अरुन नक्षणे व संपुर्ण जिल्हा च्या वतीने मोर्चा मध्ये सहकुटुंब समाजबांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here