भारती पेंदोर अनुसूचित जाती जमाती उपविभागीय अत्याचार प्रतिबंध दक्षता समितीवर सदस्य पदी.
अनुसूचित जाती जाती व अनुसूचित जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधासाठी उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती गठित.
राजू तूरणकर– संपादक.
वणी उपविभागीय स्थरावर दक्षता व नियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये भारती संतोष पेंदोर सामाजिक कार्यकर्ता यांची सदस्य पदि नियुक्ती करण्यात आली आहे .
महिलांच्या समस्या जाणून घेणाऱ्या त्यांच्या प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचे प्रश्न सोडवणाऱ्या भारतीताई संतोष पेंदोर सामाजिक कार्यकर्त्या यांनी महिलांच्या तक्रारीवर आवाज उठवून त्यांच्या विशेष त्यांच्यावर लक्ष देऊन अत्याचाराच्या गुन्ह्याच्या सातत्याने आवाज उठवला तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये महिलांना भेट देऊन महिलांच्या समस्या जाणून त्यांच्या समस्या जाणून दूर केल्या आहेे .
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती गठित करण्यात आली .माननीय शासनास माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक (नाहस )महाराष्ट्र राज्य ,मुबंई व माननीय आयुक्त, समाज कल्याण ,पुणे यांना सादर यावे .असे संदर्भीय शासन निर्णयांमध्ये नमूद आहे. केंद्र शासनाने नामर्निदेशित केलेले सामाजिक कार्यकर्त्या भारतीत संतोष पेंदोर यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वणी येथून प्रकाशित होणाऱ्या बिरसा ब्रिगेड संदेश या साप्ताहिकाचे मुख्य संपादक संतोष पेंदोर यांच्या पत्नी असून या वृत्तपत्राच्या त्या महिला संपादक सुद्धा आहे.