शिंदोला येथील व्यसनमुक्ती सम्राट रामेश्वर खोडे महाराज यांच्या भागवत सप्ताहात असाही वाढदिवस साजरा.

0
355

व्यसनमुक्ती सम्राट रामेश्वर खोडे महाराज यांचा भागवत सप्ताह शिंदोला येथे संपन्न.

भागवत सप्ताहात वाढदिवसाच्या निमित्ताने गुलाब आवारी यांनी केले गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप.

राजू तुरणकर–वणी

शिंदोला येथे व्यसनमुक्ती सम्राट रामेश्वर खोडे महाराज यांचा भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला होता. खोडे महाराज आपले अमृतमय वाणीतून भागवत प्रवचन करून प्रबोधनात्मक कार्यक्रमातून जनतेला दारू सारख्या व्यसनापासून परावृत्त करणे, गावात स्वतः झाडू घेऊन गाव स्वच्छ करणे, स्वच्छ्तेचे महत्व पटवुन देण्याचे काम खोडे महाराज करीत सातत्याने करीत असतात.

या सप्ताहाच्या निमित्त शिंदोला येथे सामाजिक कार्यकर्ते गुलाब आवारी यांनी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने करून शिबिरामध्ये गरजू लोकांना उच्च प्रतीचे ब्लॅंकेट वाटप करून परोपकारी वृत्तीचे दर्शन दिले. यावेळी संजय निखाडे व मित्र परिवाराच्या वतीने गुलाब आवारी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
भागवत चालू असताना गावात एका गरीब महिलेच्या घराला आग लागली होती , घरातील सर्व सामान जळून खाक झाले होते. ही बातमी सप्ताह सुरू असताना गुलाब आवारी यांना कळाली व त्यांनी त्या महिलेला तात्काळ नगदी स्वरूपात पाच हजार रुपयांची मदत केली, ही मदत ऐकून गावातील अन्य दानशुर लोकांनी थोडे थोडे पैसे गोळा करून त्या महिलेला तात्काळ मदतीच्या स्वरूपात जमा झालेले तीस हजार रुपये, त्या पीडित महिलेला देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे व मित्रपरिवार, गुरुदेव सेवा मंडळ शिंदोला, माऊली परिवार शिंदोला, बाबापुर, चिखलगाव, पळसोनी, मुर्धोनी येथील परिवार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here