क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती स्वच्छ्ता अभियान, शोभायात्रा, व्याख्यान, प्रबोधनाने संपन्न.
युवा किर्तनकार क्रांतीताई काळे यांच्या प्रबोधनात्मक वाणीने गणेशपूर वासी मंत्रमुग्ध.
राजू तुरणकर –वणी गणेशपूर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला समरोह समिती गणेशपूर च्या वतीने स्वच्छता अभियान, शोभा यात्रा, व्याख्यान व प्रबोधनाचा कार्यक्रम घेवून भव्य स्वरुपात साजरी करण्यात आली.
3 जानेवारीला सकाळी स्वच्छ्ता अभियान अंतर्गत गावातील प्रमुख मार्गाने श्री संत गाडगे बाबाच्या वेशभूषेत गुणवंत पचारे यांनी शोभा यात्रेत चौका चौकात स्वच्छ्ते चे महत्व पटवून देत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महत्त्व पटवून देत प्रबोधन केले. या मिरवणुकीत गावातील शेकडो महिला, विध्यार्थी व सुज्ञ नागरिक सहभागी झाले.
दुसऱ्या सत्रात दुपारी जाहीर व्याख्यान या कार्यक्रमाचे उद्घाटन सीता वाघमारे वाहतूक सहाय्यक वणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून किरणताई देरकर उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे मायाताई चाटसे सह पोलीस अधिकारी, संगीता संजय खाडे, विना पावडे मुख्याध्यापिका ज़ि. पं. गणेशपूर, मनीषा घोटकर अंगणवाडी सेविका, विजयाताई ठाकरे, सुनिताताई बोढे, विध्याताई कालेकर ग्रा पं सदस्य विरकुंड ह्या महिला उपस्थित होत्या.
जाहीर व्याख्यान कु. अभिषा गहुकार हयांनी भारतातील महिलावरील शिक्षणबंदी होती त्यावेळी भारतातील पहिली स्त्री शिक्षिका म्हणुन सावित्रीबाई फुले यांनी अथक परिश्रम घेऊन महिलांना शिक्षित करण्याचे कार्य केले व महिलांनी आधुनिक जीवनात आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन केले.
वेशभूषा करून येणाऱ्या सर्व महिलांना प्रोत्साहन म्हणुन सावित्रीबाई फुले यांच्या फोटो देण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता क्रांतीताई काळे यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने करण्यात आली. प्रबोधनाने हजारो लोकांना मंत्रमुग्ध केले, त्यांची बोलण्याच्या अप्रतिम शैलीने कधी नर्मविनोद करत, कधी परखड बोलत ते समाजातल्या घडामोडी मांडत, वास्तवाचे भान ठेवून क्रांती ताई काळे यांनी आपल्या अमृतवाणीतून महिलांना मुलांना शिक्षण संस्कार तर दारुड्या पतीला धढा शिकविण्यापासून व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिकवण आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषाली प्रवीण खानझोडे यांनी केले .उदघाट्न कार्यक्रमाचे संचालन रीना मालेकर आभार प्रदर्शन कविता रासेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सावित्रीबाई फुले जयंती महिला समारोह समिती, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.