रेती प्रश्नावरून तहसीलदार, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांनवर झाले निरुत्तर.
विशाल किन्हेकर यांच्या आरोपात तथ्य, पत्रकारांनी तहसिलदारांची प्रश्नांचा भडीमार करून केली चिरफाड.
रेती तस्करांनी केली म्हणे कर्मचाऱ्यांची खंडनीची तक्रार, करणवाडी प्रकरणाला लागले वेगळे वळण….
राजू तुरानकर –संपादक/आनंद नक्षणे मारेगाव प्रतिनिधी.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मारेगावचे तहसीलदार निलावाड यांच्यावर रेती तस्करांसोबत असलेल्या संबंधांचा खुलासा करीत गंभीर आरोप करून तहसीलदारांची योग्य चौकशी करून कडक कारवाई न केल्यास 26 जानेवारीला रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रेती प्रश्नावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरून निरुत्तर झालेले तहसीलदारांचे पितळ पडले उघडे.
करणवाडी फाट्यावर महसूल प्रशासनाचे पटवारी राजू श्रीपादवार यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांनी अवैध रेतीचा ट्रक पकडला असता त्या अवैध रेती तस्करांनी जीव घेणे शास्त्र बाहेर काढल्याने महसूल कर्मचाऱ्यांनी आपला जीव मुठीत घेऊन पळाले मात्र या गंभीर घटनेची पोलीस प्रशासनाकडे कुठलीही तक्रार केली नाही, या प्रश्नावरून पत्रकारांनी तहसीलदारांना धारेवर धरले असता तहसीलदार निरुत्तर झाले व ही घटना मला माहीतच नाही, असे सांगितले. मात्र आमच्या कर्मचाऱ्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल होत असल्याचे कारण समोर ठेवून आम्ही त्यांच्या विरोधात त्या घटनेचा रिपोर्ट दिला नाही, अशी भूमिका घेतली होती असे सांगितले.
मात्र राजू श्रीपदवार पटवारी हे तहसीलदारांच्या दालनात उपस्थित झाल्यानंतर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला असता, तहसीलदार आणि पटवारी यांच्यामध्ये बोलण्यात तफावत आढळून आल्याने तहसीलदारांचा बनावट चेहरा उघडा पडून रेती तस्करांना वाचविणे व शासनाचा महसूल बुडविण्याची भूमिका दिसून आल्याने सर्व पत्रकार चिडून तहसीलदारांना धन्यवाद देत दालनाच्या बाहेर निघून गेले.
राजू श्रीपादवार यांनी रेती तस्करांनी लोखंडी रॉड काढून जीवघेणा हल्ला केल्याचे पाहून आम्ही पळून आल्याचे कबूल कले, मात्र तहसीलदारांनी सांगितलेल्या खंडणीचा गुन्हा संदर्भात स्पष्ट नकार दिल्याने मारेगाव चे तहसीलदार उघडे पडले हे तेव्हडेच खरे, एकंदरीत रेती चोरी गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली नाही त्यामुळे या गंभीर घटनेची चौकशी होणे गरजेचे आहे व शिवसेनेचे तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांच्या आरोपात तथ्य असल्याने मारेगाव तालुक्याचे तहसीलदार यांची उच्च स्तरीय चौकशी झाल्यास दोषारोप होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.