Home Breaking News वणीचे तीन युवक वर्धा नदी पात्रात बुडाली…

वणीचे तीन युवक वर्धा नदी पात्रात बुडाली…

0
1353

वणी शहरातील तीन अल्पवयीन युवक वर्धा नदी पात्रात बुडाली, शोध घेणे सुरू.

महाशिवरात्रीच्या यात्रेचे दर्शन घेऊन आल्यानंतर नदीत आंघोळीचा मोह जीवावर बेतला.

राजू तूरणकर – लोकवाणी जागर संपादक.

संपूर्ण देशामध्ये महाशिवरात्री उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. संपूर्ण देशभरामध्ये हजारो ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये जत्रांचा आयोजन असते .विविध ठिकाणी शिव मंदिर असल्याने भक्तांची मोठी मांदियाळी असते. काल चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात येणाऱ्या भटाळा येथे महाशिवरात्री निमित्य मोठे प्रमाणात शिवभक्त गेले होते.वणीतील सुद्धा काही युवक या जत्रेसाठी गेले. परतीच्या प्रवासात दर्शन घेऊन येत असताना वर्धा नदी पात्र पाटाळा येथे आल्यानंतर त्यांच्या मनात नदीपात्रात आंघोळ करण्याची इच्छा निर्माण झाली, अंगोळीला उतरले असता, त्यातील दिघे जण बुडाल्याची  धक्कादायक माहिती ५ वाजताच्या सुमारास समोर आली आहे. यात हर्षल अतिष चाफले, अनिरुध्द सतिष चाफले,संकेत पुंडलिक नगराळे तिघांचे ही अंदाजे वय १६  ते २२ च्या सुमारास आहे.

चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुक्या अतर्गत येत असलेले भटाळा हे प्राचीन मंदिर आहे.दरम्यान या ठिकाणी दूरवरून भक्तगण दर्शनासाठी येत असतात. त्याच यात्रेकरिता वणीतील ११ युवक दर्शनाकरिता गेले होते. दर्शन घेऊन वणी च्या दिशेने येताना पाटाळा येथील वर्धा नदी पात्रात अंगोळीचा मोह त्यांना आवरला नाही. ते अंगोळीला वर्धा नदीत गेले असता, त्यातील काही युवकांपैकी अगोदर एक युवक नदी पात्रात गेला मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला तो परत न आल्याने त्या मागे दोघे गेले.परंतु तिघेही नामे हर्षल अतिष चाफले, अनिरुध्द सतिष चाफले, संकेत पुंडलिक नगराळे, तिघेही रा विठ्ठलवाडी, वणी, तिघांचे ही अंदाजे वय १६ ते २२ च्या सुमारास आहे. परंतु ते पाण्यातुन परत आले नाही. घाबरलेल्या इतरांनी घरच्यांना याची माहिती दिली. वृत्त लिहे पर्यंत त्यांचा कुठलाही ठावठिकाणा लागला नाही. घटनास्थळी वणी, माजरी, वरोरा पोलीस पोहोचले असुन पुढील तपास सुरू आहे. रात्र झाल्यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली होती.  आज सकाळी पुन्हा या युवकांचा शोध घेण्यात येणार आहे.

 दोघे भाऊ  तर एक शेजारी मित्र….. 

वणीतील विठ्ठलवाडी परिसरातील तिघेही असुन एका कुटुंबातील दोन भाऊ नदीत बुडल्याने कुटुंब यावर फार मोठा आघात झाला. दरम्यान महाशिवरात्रीच्या दिवशी त्या कुटुंबियांवर काळाचा घाला झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!