महसूल प्रशासनाचे वतीने मारोती किनाके यांचा सन्मान.
राजू तुरानकर – वणी.
शासकीय मैदान वणी येथे प्रजासत्ताक दिनाच्या औचीत्याने आज 26 जानेवारी 2024 ला आमदार संजीव रेड्डी यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांनी मारोती किनाके यांचा ग्रामीण रुग्णालयात उत्कृष्ठ सेवा दिल्याबद्दल सन्मान चिन्ह देवुन सत्कार करण्यात आला.

गेल्या १८ वर्षापासून वणी ग्रामीण रुग्णालयात मारोती किनाके है मृतदेहाचे विच्छेदन करण्याचे काम २००६ पासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून वणी ग्रामीण रुग्णालयात करीत आहे. केवळ शवविच्छेदनच नाहीं, तर इतरही सेवा देण्यासाठी वणी ग्रामीण रूग्णालयात ते सदैव तत्पर असतात त्यांच्या या परोपकारी वृत्तीची व सेवेची दखल घेत महसूल विभागाच्या वतीने हा सन्मान करण्यात आला आहे.












