युवासेना जिल्हा समन्वयक समीर लेनगुळे तर उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांची फेर निवड.
वणी विधानसभा क्षेत्रातील दोन दबंग युवकांच्या खांद्यावर युवासेनेची धुरा… युवासेनेत जल्लोष.
लोकवाणी जागर.
महाराष्ट्र राज्याचे शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नुकतीच जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांची नावे जाहीर केली आहे. त्यामध्ये युवासेनेच्या जिल्हा समनव्यक पदी समीर लेनगुळे तर उपजिल्हा प्रमुख पदी शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते अजिंक्य शेंडे यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेना यवतमाळ जिल्हा समन्वयक पदी युवा व्याख्याते समीर लेनगुळे यांची नियुक्ती गेल्या अनेक दिवसापासून समीर हे समाजकारण व राजकारण यामध्ये सक्रियपणे सहभाग घेऊन अनेक लोकांचे कामे शासन दरबारी नेवून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी धडपड करीत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांची युवा सेनेच्या समन्वयक पदी निवड करण्यात आलेली आहे.
युवासेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते अजिंक्य शेंडे यांची सलग चौथ्यांदा निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निष्ठावान कार्यप्रणालीची ही पावती असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना व समस्यांना वाचा फोडून आपल्या कार्यशैलीचा परिचय दिला. एका हाकेवर जनतेच्या समस्यांना घेऊन प्रशासनाला जाब विचारणारे कार्यतत्पर व्यक्तिमत्व म्हणून शहरात अजिंक्य शेंडे यांनी ओळख निर्माण केली आहे. तडफदार युवा शिवसैनिक म्हणून त्यांचं सामाजिक व राजकीय कार्य उल्लेखनीय आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांची पदोन्नती करून त्यांच्या पक्षाप्रती असलेल्या निस्वार्थ भावनेची खऱ्या अर्थाने कदर केली आहे. त्यांना सामाजिक व राजकीय कार्य करतांना व सार्वजनिक विषय हाताळतांना राजकीय बळ मिळावं, हे त्यांच्या पदोन्नतीमागचं कारण असल्याची चर्चा आहे.
त्यांची सलग चौथ्यांदा निवड झाल्याने युवा सेनेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना हा पक्ष तळागळातील गोरगरिबांचा पक्ष असून त्या पक्षाचा विचार अजेंडा जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी त्यांनाही नियुक्ती दिली आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता ह्या नियुक्त्या महत्त्वाच्या मानले जात आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील दोन दबंग युवकांच्या खांद्यावर युवासेनेची जबाबदारी पक्षाने दिल्यामुळे युवकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असल्याने युवकांचा कल शिवसेना (उबटा ) दिसून येत आहे. यामुळे नक्कीच पक्ष संघटन मजबूत होणार असल्याची चर्चा सुरू आहे.