वणी कृ.उ.बा.समितीच्या अंतर्गत ‘गोदाम कम ऑफिस’ च्या लीलावा मध्ये सर्वसमावेशक आरक्षणाची तरतूद करा— संभाजी ब्रिगेड.
शेतकरी हित जोपासल्या गेले पाहिजे— अजय धोबे.
राजू तुरणकर— वणी.
वणी कृषी उत्पन्न बाजार समितीने ‘गोदाम कम ऑफिस ‘ चा २९ वर्ष कालावधीसाठी लिज डिड करून, अनामत रक्कम घेऊन व भाडे करारनामा करून लिलाव करण्याचे जाहीर केलेले आहे. परंतू या संपूर्ण लिलाव प्रक्रियेस संभाजी ब्रिगेड ने आक्षेप घेतला असून सदर ७८ गोदाम कम आफिस ची सोडत खालील प्रमाणे आरक्षणाची तरतूद करून करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड वणीच्या वतीने करण्यात आली आहे.
शेतकरी शेतमजूर यांच्या हिताच्या दृ्टीकोनातून आरक्षणाची तरतूद करून स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण सोसायटी व शेतकरी उत्पादक कंपनी) , महिला आरक्षण, शेतकरी आरक्षण व ओबीसी, एस. सी. , एस.टी.च्या प्रमाणात राखीव ठेवल्याने समाजातील सर्व घटकातील तरुण युवक, महिला, शेतकरी व उत्पादक कंपन्या यांना व्यवसायाची समान संधी ऊपलब्ध करून देण्यापर्यंत लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात येऊन शेतकऱ्यांचे हित जोपासल्या जावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे यांनी केली.
यावेळी संभाजी ब्रिगेड चे ॲड. अमोल टोंगे, अभय पानघाटे, जय मांढरे, शुभम कडू,संजय गोडे व दत्ता डोहे आदी उपस्थित होते.