मारेगाव तालुक्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट.

0
230

चिंचाळा येथून 1 लाखाचे बोगस बियाणे पकडले

कृषी विभागाच्या यवतमाळ व मारेगाव भरारी पथकाची संयुक्त कारवाई तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

आनंद नक्षणे मारेगाव : पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचाळा येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजता छापा टाकून तेथून1लाख1हजार 202 रुपये किंमतीचे कापसाचे बोगस बियाणे यवतमाळ मारेगाव कृषी विभागाच्या संयुक्त भरारी पथकाने पकडले़ याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात तिघां जणाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले .

मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चिंचाळा येथे विलास चिकटे नामक व्यक्ती बीजी 4 बीज 5 नावाचे बोगस कापसी बी-बियाणे विक्रीसाठी आणले असल्याची गोपनीय माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र मालोदे(जिल्हा परिषद यवतमाळ) यांना मिळाली़ त्यानुसार, कल्याण पाटील जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी (यवतमाळ), पंकज बर्ड कृषी अधिकारी (यवतमाळ), संजय वानखेडे कृषी अधिकारी, वणीचे कृषी अधिकारी संदीप वाघमारे, कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी सुनील निकाळजे, धीरज साळुंखे कृषी विस्तार अधिकारी मारेगाव यांच्या याच्या संयुक्त भरारी पथकाने गुरुवारी दुपारी अडीच वाजता छापा टाकला़ असता त्यात 1 लाख 1हजार 202 रुपये किंमतीचे कापसाचे बी-बियाणे आढळून आले़ बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात विकास चिकटे यांच्यासह तिघां विरुध्द कृषी अधिकारी वाघमारे यांनी फिर्याद दाखल केली असून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here