Home Breaking News आमदारांचा संताप अनावर, मटका जुगार स्थळी स्वतः टाकली धाड

आमदारांचा संताप अनावर, मटका जुगार स्थळी स्वतः टाकली धाड

0
1311

आमदारांचा संताप अनावर, शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात…

पोलिसांच्या परवानगीने सुरू असलेल्या वरली मटक्यावर आमदारांची धाड….

आमदार पोहोचण्यापूर्वी माहिती देणारा तो कोण… पोलीस प्रशनातील शकूनिमामा…

राजू तूरणकर — संपादक लोकवाणी जागर…

वणी शहरात मटका, जुगार, झंडीमुंडी, ओपन क्लब अशाप्रकारचे अवैध धंदे गेल्या काही महिन्यापासून सुरू आहेत. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार या संदर्भात पोलीस प्रशासनाला अनेकदा हा प्रकार बंद करून शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना करणे संदर्भात ताकीद दिली परंतु पोलीस प्रशासन हे अवैध व्यावसायिकाच्या हातचे बाहुले झाल्याचे पाहून आमदार महोदय हे स्वतः ॲक्शन मोडवर येऊन प्रत्यक्ष जुगार मटका स्थळी धाड टाकल्याने पोलीस प्रशासनाचे लक्तरे वेशीवर टांगल्या गेली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोळसा खदाणीमुळे वणी तालुक्याला (ब्लॅक डायमंड सिटी) म्हणून ओळखले जाते. परंतु, या वणी शहरात गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले आहे. ठिकठिकाणी मटका, जुगार खुलेआम सुरू असून, पोलिसांच्या आशिर्वादामुळे हे सर्व प्रकार सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. आमदारांनी स्वतः ठाणेदार यांना गोर गरिबांना लुटण्याचे धंदे बंद करण्यासंदर्भात तीन चार वेळा समज दिला असल्याचे त्यांनी सांगितलं. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे, हे जेव्हा यांच्या लक्षात आल्यावर आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार संतापून  स्वतः पाहणी करून मटका जुगाराची पोलखोल केली.
दिवभर मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात. त्यांचा परिणाम परिवारावर होतो, शाळेच्या परिसरात खुले आम चालवतात त्यामुळे एस पी साहेबांना याबाबत माहिती दिली आहे. परंतु आता मला असले धंदे अजिबात नको, तातडीने बंद करा, चोऱ्या, दरोडा, खून हे सर्व ठाणेदार आल्यापासून वाढले भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.

तो माहिती देणारा शकुनिमामा कोण?

आमदार महोदय हे मटका स्थळी धाड टाकण्यासाठी येत असल्याची खबर देणारा तो कोण याची चौकशी होणे गरजेचे आहे. आमदार महोदय पोहोचण्यापूर्वी टेबल खुर्च्या गुंडाळल्या गेल्या होत्या.. खुलेआम टवाळखोरी करीत सार्वजनिक स्थळी, नगर परिषद शाळेला लागून, भाजी मंडी सारख्या ठिकाणी असा नंगा नाच सुरू असतो आणि पोलीस प्रशासन ला ठाऊक नसते ही शरमेची बाब आहे…
चोऱ्या, रेती तस्करी, कोळसा तस्करी, गांजा तस्करी, गुटका तस्करी, ऑनलाईन क्रिकेट सट्टा बाजार,दारूचा महापूर, दरोडे, मटका याच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई न करणारे पोलीस, मागील तीन चार वर्षात एकही खुनाचा तपास न लावणाऱ्या वणी पोलीस ठाण्यात नेमके काय चालतंय. वणी पोलीस ठाणे कोणाचे रक्षण करण्यासाठी. असा प्रश्न आता वणीकर जनतेला पडायला लागला आहे….

जिल्हा पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार यांची इज्जत आमदार संजिवरेडी यांच्या ॲक्शन मोडवर आल्याने चव्हाट्यावर आली आहे. जनमानसात आमदार संजीव रेड्डी यांचे या कृती बद्दल समाधान व्यक्त करण्यात येत असून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!