आश्रमात कांबळे यांचा वाढदिवस साजरा.
सामाजिक जाणिवेतून मुलांच्या चेहऱ्यावर निर्माण केला आनंद…
आनंद नक्षणे – मारेगाव : प्रेस संपादक व पत्रकार संघ तालुका शाखा मारेगाव च्या वतीने जळका येथील अनाथाश्रम मध्ये पत्रकार माणिक कांबळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.मंथन सभाग्रुहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकवाणी जागरचे संपादक राजुभाऊ तुरणकर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रेस संपादक व पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम,मिशन इंडिया तथा जन संग्रामचे तालुका प्रतिनिधी अनंत गोवर्धन, पत्रकार, राजु घुमे, आनंद नक्षणे, पिसगाव आदिवासी सोसायटीचे अध्यक्ष सुदर्शन टेकाम, प्रामुख्याने उपस्थित होते,
सांध्य.दै.मार्मिकच्या तालुका प्रतिनिधी प्रतिभा तातेड, यांनी अभिष्टचिंतन सोहळ्याचे सुत्रसंचालन केले,प्रास्ताविक समुपदेशक दिक्षा नागदेवे यांनी केले तर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी धन्य झालो व सर्वांचे आभार माणिक कांबळे यांनी मानले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हाने आणि समाजाकडुन ‘अपेक्षा’ या विषयावर मंथन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना राजुभाऊ तुरणकर म्हणाले की, जिद्दीने प्रयत्न केल्यास विद्यार्थ्याना यशाचे शिखर गाठता येईल, अभ्यासात अधिक मेहनत घेऊन आपआपली ध्येय गाठावे असे मार्गदर्शन करुन बालसदनला दहा विविध जातीचे फळ वृक्षाच्या रोपट्याची भेट देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच जेष्ठ पत्रकार माणिक कांबळे यांच्या हस्ते केक कापुन फळवाटप करण्यात आले.
या प्रसंगी मार्गदर्शन पर दोन शब्द व्यक्त करताना पत्रकार कांबळे म्हणाले की, बालसदन मध्ये विद्यार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिकारी वर्गातील उच्च स्थान प्राप्त करावे, ज्या दिवशी ही बातमी माझ्या लिखानातुन वृत्त पत्रात झळकेल त्या दिवशी माझ्या लेखणीला खऱ्या अर्थाने यश मिळाले असे मानेल, त्या नंतर सुदर्शन टेकाम, अनंत गोवर्धन यांनी सुध्दा उपस्थित विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी सह्याद्री चौफेरचे संपादक कुमार अमोल कुमरे, पंकज नेहारे, कैलास मेश्राम, रोहन आदेवार, सुरज झोटिंग, संदीप कोवे, यांनी प्रयत्न केले.