मारेगाव शहरात स्वच्छता मोहीम व डास मुक्त फवारणी अत्यावश्यक.

0
143

नागरपंचात हद्दीत येत असलेल्या सर्व प्रभागात  डास मुक्त व साफसफाई मोहीम अत्यावश्यक.

डासांमुळे फैलत आहे अनेक आजार, नगर पंचायत विभाग निद्रेत. डेंगू चिकनगुनिया आजाराचे सावट.

आनंद नक्षणे – मारेगाव शहरातील काही प्रभागात परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे लोकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे मारेगाव शहरात डासाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे ,तसेच या भागात नगरपंचायत च्या वतीने डास मुक्त व साफसफाई मोहीम त्वरित करण्यात यावी व लोकांचे आरोग्य धोक्यात येण्यापासून रोकावे अशी मागणी प्रभागातील नागरिक सह सामाजिक कार्यकर्ते करीत आहे.

सध्या अनेक प्रभागात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे घाणीची साम्राज्य निर्माण झाले आहे. परिणामी डासांचे फार मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढले आहे.  त्यामुळे डासांच्या प्रादुर्भाव वाढल्या मुळे मलेरिया डेंगू अश्या रोगामुळे लोक चिंतीत असून दवाखान्यात अनेक रुग्ण दाखल होत आहे. तरी मारेगाव नगरपंचायतने सर्व प्रभागा मधील गल्ली या परिसरातील त्वरित मच्छर धूर फवारणी व नाल्यावर ची फवारणी व स्वच्छता मोहीम करावी अशी मागणी 2 व 3 या भागातील नागरिकांसह केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here