अरेच्या घोंसा रोडवरच तलाव, नागरिक बेहाल…

0
187

घोंसा रोड ला आले तलावाचे स्वरूप, नगरसेवकांच्या भूमिका बघ्याची तर संबंधित प्रशासनाचे हात वर…

आनंद नक्षणे – मारेगाव येथील घोंसा रोड कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर  खड्डे पडल्याने पाणी साचून तलाव सदृश्य स्वरूप रस्त्याला प्राप्त झाले आहे. मात्र नगरसेवकाच्या बेताल भूमिकेने एखादा मोठा अपघात होण्याचे संकेत मानले जात आहे.रस्त्याकडे हेतुपूरस्सर दुर्लक्षानेसर्वत्र संतापाची लाट पसरत आहे. येथील नागरिक हे गढूळ पाणी नगरपंचायत कार्यालयात नेवून टाकण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

मारेगाव नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून नको त्याठिकाणी सिमेंट रस्ते व नालीचे काम करण्यात धन्यता मानली. मात्र मारेगाव शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणी घोंसा रोड कडे जाणाऱ्या सुरुवातीलाच साचलेल्या पाण्यातून नागरिकांना पायवाट करावी लागत असल्याचे मारेगावकरांसाठी दुर्देवाची बाब ठरत आहे.

येथील प्रभागातील नगरसेवक नेहमीच येजा करतांना याकडे बघ्याची भुमिका घेत दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

दरम्यान, घोंसा रोडवर असलेल्या तलाव सदृश्य रस्त्याकडे कुचकामी ठरत असलेला नगरसेवक आतातरी लक्ष देईल काय? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. विकासाचे एकही व्हिजन नसलेला नगरसेवक एखाद्या मोठ्या अपघाताची तर प्रतीक्षा करीत नसेल ना ? असा संतापजनक सवाल नागरिकांचा आहे.

येत्या आठ दिवसात हा रस्ता सुरळीत न झाल्यास डबके भरून गढूळ पाणी नगरपंचायत कार्यालयात टाकु असा गर्भीत ईशारा येथील नागरिकांनी दिला आहे…

मुख्याधिकारी मारेगाव यांच्याशी लोकवाणी जागर प्रतिनिधींनी संपर्क साधला असता हा रस्ता पीडब्ल्यूडी च्या हद्दीत येते मी पत्रव्यहार करतो असे म्हणत हातवर केल्याने आता pwd आणि नगरपंचायत यांच्यात वादात जनतेला वेठीस धरले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here