देवराव वाटगरे वणी विधानसभेच्या रिंगणात…

0
62

देवराव वाटगरे वणी विधानसभेच्या रिंगणात…

लोकसभेच्या निवडणुकीत घेतली होती मते…..

राजु तुरणकर – संपादक 

बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या वतीने वणी विधानसभे च्या निवडणुकी करीता ओबीसी नेते तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष देवराव वाटगुरे यांनी नामांकन अर्ज दाखल केला असुन, दलीत आदिवासी भूमिहीन बेघर ओबीसी गरीब मराठा तथा सातबारा नावावर नसलेल्या शेतकऱ्यांच्या आणि मूलभूत प्रश्न घेऊन प्रचार करणार असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे प्रणेते भाई जगदिश कुमार इंगळे यांनी दिली. यावेळी बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा तथा शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्ष इंदिरा बोंदरे,  मां जिजाऊ संघर्ष समितीचे संस्थापक तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष  सुखदेव कांबळे, समशेर सिंग भोसले, फासे पारधी समाजाचे संस्थापक अध्यक्ष तथा बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विलास पवार यांची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here