करण देवतळे यांचे विरोधकांपुढे तगडे आव्हान.

0
200

करण देवतळे यांचे विरोधकांपुढे तगडे आव्हान…..

भद्रावती – वरोरा मतदार संघातील जनतेच्या मनातील भावी आमदार…..

राजु तुरणकर – वणी..

भद्रावतीः भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात भाजपने चर्चेतील नावे बाजूला सारून ऐनवेळी करण देवतळे यांना महायुतीची उमेद वारी घोषित करून निवडणूक रिंगणात मोठी खेळी खेळत सध्या तरी सरशी साधली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण काकडे यांची ओळख मतदार संघासाठी केवळ खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू म्हणून तर वरोरा मतदार संघाचे सामाजिक, सांस्कृतिक शैक्षणिक वारसा जोपासणारे देवतळे परिवाराचे राजकिय सुस्वभावी वारसदार करण देवतळे या दोघांमध्ये भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील लढत निर्णायक ठरणार आहे.

करण देवतळे यांची उमेदवारी अनेकांना अनपेक्षित वाटत असेल मात्र ही उमेदवारी अनपेक्षित नव्हे तर अपेक्षित अशीच होती.

स्वर्गीय संजय देवतळे यांची व घराण्याची राजकीय जादू वरोरा क्षेत्रात कायम आहे. येत्या निवडणुकीत ते दिसुनही येईल. वडिलांप्रमाणेच सभ्य, सोज्वळ, प्रमाणीक व नम्रता करण देवतळे यांच्यामध्येही दिसुन येते. अलीकडच्या राज- कारणात अशी प्रतिमा असलेली माणसे मिळणे कठीण आहे. एक मात्र खरे की करण देवतळे यांच्या रूपाने भाजपने एक सशक्त उमेदवार दिला असुन विरोधकांसमोर निवडणुकीच्या पहिल्या चरणातच तगडे आव्हान उभे केले आहे.

तर दुसरीकडे बाळू धानोरकर यांचे राजकिय वारसदार अनील धानोरकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दाखल केल्याने पारिवारिक वाद उफाळुन आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असली तरी याची प्रचिती निवडणुक प्रचार दरम्यान जनतेला अनुभवायला मिळणार आहे. 

मुकेश जिवतोडे महाविकास आघाडीचे घटक असलेल्या उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख असुन जबरदस्त दबंग व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची अपक्ष उमेदवारी धडकी भरवणारी आहे.

तुल्यबळ प्रतिस्पर्धी आणि निवडणुक रिंगणात उमेदवारांची रांग कोणाच्या पथ्यावर….

होवू घातलेल्या भद्रावती वरोरा मतदार संघाच्या निवडणुकीत प्रवीण सुरेश काकडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष), अमोल दिलीप बावणे (अपक्ष) राजू मारोती गायकवाड (अपक्ष), जयवंत नथुजी काकडे ( BRSP ),जयंत मोरेश्वर टेमुडे( अपक्ष), अहेतेशाम सदाकत अली (प्रहार जनशक्ती ), श्रीकृष्ण धुमदेव दडमल (अपक्ष ), रंजना मनोहर पारशिवे (अपक्ष), करण संजय देवतळे (भाजपा), मुकेश मनोज जीवतोडे (अपक्ष ), चेतन गजानन खुटेमाटे(अपक्ष), महेश पंढरीनाथ ठेंगणे (अपक्ष), मुनेश्वर बापूराव बदखल (अपक्ष), रमेश महादेवराव राजुरकर (अपक्ष), प्रवीण धोंडूजी सुर (मनसे), प्रवीण मनोहर खैरे (अपक्ष), नरेंद्र नानाजी जीवतोडे (अपक्ष), सुभाष जगन्नाथ ठेंगणे (अपक्ष), अतुल ईश्वर वानकर (अपक्ष), अनिल नारायण धानोरकर (वंचित बहुजन आघाडी), सागर अनिल वरघणे (बहुजन समाज पक्ष), तारा महादेवराव काळे (अपक्ष), सेवकदास कवडूजी बरके ( पीपल्स पार्टी ऑफ इंडिया ( डेमोक्रेटिक) इत्यादी उमेदवारांनी निवडणुक रिंगणात कंबर कसली आहे.

करण देवतळे यांचा शांत स्वभाव, भाजपचे पक्षात्मक संघटन, पक्ष संघटनेतील उमेदवारीवरून एकोपा व लाडकी बहिण योजनेचा फायदा ह्या सर्व बाजू जमेच्या असल्याने जनतेच्या मनातील आमदार करण देवतळे असे चित्र निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here