विश्वास नांदेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी.

0
3839

विश्वास नांदेकर, यांची शिवसेनेतून हकालपट्टी……

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथून पक्ष विरोधी कारवाईची गंभिर दखल..

लोकवाणी जागर वृत….

वणी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे असलेले संजय खाडे यांच्या समर्थनार्थ  शिवसेना ऊ. बा. ठा. गटाचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी ऊबाठा गटाचे अधिकृत उमेदवार संजय देरकर यांच्या विरोधात बंड थोपटल्यामुळे शिवसेना पक्षाकडून या बाबीची गंभीर दखल घेत विस्वास नांदेकर, चंद्रकांत घुगल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी – मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे वणी तालुकाप्रमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली , असून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here