गोमांस विक्री करतांना दोघांना अटक, मारेगाव पोलिसांची कारवाई.

0
200

गोमांस विक्री करतांना दोघांना अटक, मारेगाव पोलिसांची कारवाई.

पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गोमांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

आनंद नक्षणे – मारेगाव  बेकायदेशीररित्या गोवंशीय कत्तलकरून विक्रीसाठी साठलेले १५ किलो मांस मंगळवार सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पोलिसांनी सोनुपोड परिसरातून जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांवर मारेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सोनुपोड येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंशीय कत्तल करून मांस विक्री करण्यासाठी साठवल्याची गोपनीय माहिती मारेगाव पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी छापा टाकून १५किलो मांस ( बाजारमूल्य ३००० हजार रू. ) जप्त केले.

याप्रकरणी सुलेमान शेख आणि रिजवान सुलेमान शेख ( रा.मारेगाव ) यांच्या विरोधात मारेगाव पोलिस ठाण्यात पोलिस जमादार रजनीकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहेत.पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गोमांस विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अनेक सुरमा यात सामील असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. जनावरे वाहतूक पोलिसांनी रोखल्याने आता गो तस्करांनी हा मार्ग निवडल्याची चर्चा ऐकू येत आहे.

ही कारवाई मारेगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोळंकी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रजनीकांत पाटील , अतुल सरोदे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here