लोहार समाजाचा भव्य राज्यस्तरीय वर- वधू परिचय मेळावा संपन्न.
आमदार संजय देरकर यांचे हस्ते मेळाव्याचे उद्घाटन.
बंडु नींदेकर – वणी लोहार समाज वणी चा भव्य राज्यस्तरीय परिचय मेळावा सालाबाद प्रमाणे तिरुपती मंगल कार्यालय येथे वणीचे आमदार मा संजय देरकर यांचे शुभहस्ते लोहार समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
या दोन दिवसीय मेळाव्यात पहिल्या दिवशी लहान मुलांसाठी नृत्य स्पर्धा, एक मिनिट स्पर्धा, महिला साठी रांगोळी स्पर्धा व विविध कार्यक्रम घेण्यात आले याचे संचालन महिला अध्यक्ष सौ छायाताई निंदेकर यांनी केले यावेळी मंचावर संघटनेचे सर्व सल्लागार उपस्थित होते
दुसऱ्या दिवशी मुख्य कार्यक्रम वधू-वर परिचय व समाज बांधव परिचय मेळावा पार पडला. यावेळी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते भगवान प्रभू श्री विश्वकर्मा यांचे पूजन करण्यात आले, यावेळी जि. काँ. उपाध्यक्ष इजहार शेख. वै,गा,लो,व त,जाती महासंघ नागपूर चे पदाधिकारी व पडघम सर ,पिएसआई प्रमोदजी मेश्राम, बावने सर,कोसरे सर,बांगडे सर तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जगन जुनगरी, भगवान मोहीते व समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते
महासंघाचे माजी युवा अध्यक्ष माणिकराव शेंडे व जितेश मेश्राम, संपादक दै.प्रहार मधुकरराव शेंडे ,पिएसआई जमनादासजी सोनटक्के, सुरेश मांडवगडे यांनी आपले विचार समाजासमोर ठेवले
यावेळी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक आमदार श्री संजय बाबू देरकर यांनी आपले विचार मांडले व संघटनेच्या नियोजनाचे भरभरून कौतुक केले पूर्णशक्तीनीशी संघटनेच्या पाठीशी उभे राहायचे त्यांनी वचन दिले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सल्लागार दिनकरराव निंदेकर यांनी भुषविले.तर विशेष योगदाना बदल बाबारावजी चट्टे यांचं आभार मानले.
प्रास्ताविक रमेश झिंगरे, संचालन अनिल कांबळे तर आभारप्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष नितीन धाबेकर यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संघटनेचे सल्लागार बंडू निंदेकर , संजय गाताडे कार्याध्यक्ष राहुल चट्टे उपाध्यक्ष रवी गाताडे.निलेश सोनटक्के सचिव तथा महासंघ जिल्हाध्यक्ष शिरीष क्षिरसागर, सहसचिव आकाश खंडाळकर.कोषाध्यक्ष प्रशांत सोनटक्के युवाध्यक्ष संतोष सावरकर संदिप वाघाडे,पवन खंडाळकर सुधिर खंडाळकर, विलास खंडाळकर, धनंजय वासेकर,तुषार कांबळे,राकेश मांडवकर,दिनेश खंडाळकर,मिथलेश वाघाडे,योगेश वाघाडे दशरथ गिरडकर जयश्री चट्टे,कीर्ती सुर्तेकर, अमृता चट्टे,पुजा केळकर,सुवर्णा क्षिरसागर, संध्या मेश्राम, यासह अनेकांनी परिश्रम घेतले