“अस्सा नवरा नको ग बाई” नाटकाने चंद्रपूर गाजवले.

0
200

राज्य नाट्य स्पर्धेत अस्सा नवरा नको ग बाई नाटकाची ची धम्माल.

वणी मारेगावच्या कलावंतांचे अफलातून सादरीकरण
– चंद्रपूरचे नाट्यगृह हाऊसफुल्ल…!

आनंद नक्षणे – मारेगाव येथील कलावंतांनी अखंड मेहनत घेऊन महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत धमाल केली.” अस्सा नवरा नको ग बाई “ हा नाट्य प्रयोग चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात अतिशय यशस्वीपणे पार पडला. या नाटकास रसिक प्रेक्षकांची प्रचंड गर्दी झाली.

एकेकाळी वणी मारेगाव या ठिकाणी मोठी नाट्य परंपरा होती. वणी येथे अनेक दिग्गज कलावंत होते. लोकमान्य टिळक महाविद्यालय हे पूर्वी नाट्यगृह होते. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथील संजीवनी नाट्य कला मंदीर चे नाटक संपूर्ण विदर्भात गाजत असे. टीव्ही मोबाईल ने नाटक कमी होत गेली.मात्र आता नाटकांना पुन्हा चांगले वैभव प्राप्त होत आहे. वणी मारेगावच्या कलावंतांनी राज्य शासनाच्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय घेतला. महिनाभर अथक परिश्रम घेतले. आणि तुडुंब भरलेले नाट्यगृह तीन तास पोट धरून हसू लागले. प्रेक्षकांनी हे नाटक अक्षरशः डोक्यावर घेतले.

या नाट्य प्रयोगासाठी अपेक्षेपेक्षा जास्त रसिक प्रेक्षक आले. संध्याकाळी सात वाजता प्रयोग होता परंतु साडे सहा वाजताच नाट्यगृह हाऊसफुल्ल झाले. अनेकांना जागाच न मिळाल्याने पायऱ्यावर, दरवाज्या जवळ गर्दी करून प्रेक्षक नाटक बघू लागले. गर्दीने आयोजकांची तारांबळ उडाली. नाईलाजास्तव गर्दी आवरण्यासाठी मुख्य प्रवेश द्वारावरच कुलूप लावण्यात आले. अनेक प्रेक्षक परत गेले.चंद्रपूर च्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले.

यात प्रमुख भूमिकेत रमाकांत लखमापूरे, प्राचार्य हेमंत चौधरी, गुलशेर पठाण, आयेशा खान, वैशाली वातीले, अँड. मेहमूद पठाण, प्रणाली घूंगरुळ, अनिल सोनवाने, समाधान भगत, वैभव चौधरी, मोरेश्वर कनकूंटवार, सागर मडावी, महेंद्र पुरी आणि महेंद्र नक्षिने यांनी सर्वोत्तम भूमिका केल्या.संगीत जफर खान ,नेपथ्य सानिया खान यांनी तर प्रकाश योजना दिवाकर बोरकर यांनी सांभाळली.रंगभूषा अँड. रूनाली गाणार यांनी तर वेशभूषा प्रणिता चौधरी, राणी लखमापूरे यांनी केले. रंगमंच सहाय्य सिद्धू गाणार यांनी केले.

इतिहास घडला..

या नाट्य प्रयोगासाठी अपेक्षेपेक्षा जास्त रसिक प्रेक्षक आले. संध्याकाळी सात वाजता प्रयोग होता परंतु साडे सहा वाजताच नाट्यगृह हाऊसफुल्ल झाले. अनेकांना जागाच न मिळाल्याने पायऱ्यावर, दरवाज्या जवळ गर्दी करून प्रेक्षक नाटक बघू लागले. गर्दीने आयोजकांची तारांबळ उडाली. नाईलाजास्तव गर्दी आवरण्यासाठी मुख्य प्रवेश द्वारावरच कुलूप लावण्यात आले. अनेक प्रेक्षक परत गेले.चंद्रपूर च्या इतिहासात हे पहिल्यांदा घडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here