अभ्यास, संयम आणि जनसेवेचा प्रवास – पांडुरंग कृ. टोंगे.

0
181

अभ्यास, संयम आणि जनसेवेचा प्रवास – पांडुरंग कृ. टोंगे

लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

राजु तुरानकर – संपादक लोकवाणी जागर.

वणी शहराच्या सामाजिक, प्रशासकीय आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे सन्माननीय पांडूरग  कृष्णाजी टोंगे हे नाव आजही नागरिकांमध्ये आदराने घेतले जाते. शांत, संयमी आणि समजूतदार स्वभावामुळे त्यांनी आपल्या कार्यशैलीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मागील अनेक दशकांपासून वणी शहराच्या विकासासाठी, नगरपरिषदेच्या हितासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करून योग्य मार्गदर्शन करणे, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय साधणे, तसेच शहरहिताला प्राधान्य देणे ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे.

पांडुरंग टोंगे हे केवळ माजी नगराध्यक्ष म्हणून नव्हे, तर एक अभ्यासू विचारवंत आणि जनतेच्या भावना समजून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी आपल्या अनुभवातून अनेकांना प्रेरणा दिली आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे वाटणारे त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व आणि शांत स्वभाव हीच त्यांची खरी ताकद आहे.

वणी शहराच्या विकासासाठी विधायक विचार मांडत त्यांनी सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविला. प्रसिद्धीपेक्षा कार्याला महत्त्व देत जनहित जपण्याचा त्यांचा ध्यास अनेकांसाठी आदर्श ठरतो.

समाजहिताचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून सातत्याने कार्यरत असलेल्या सन्माननीय टोंगे सर यांच्या वैचारिक आणि सामाजिक कार्याला मानाचा मुजरा!

त्यांना निरोगी, आनंदी आणि उदंड आयुष्य लाभो, हीच लोकवाणी जागर परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here